पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वातंत्र्योत्तर कालखंडात महाभारताधिष्ठित ललित साहित्याची विशेष लक्षणीय निर्मिती झाली आहे. मराठी प्रतिभावंतांनी महाभारतावर . आधारित ललित साहित्यात महाभारतातील व्यक्तींना विशेष प्राधान्य दिले आहे. हे लक्षात घेऊनच प्रस्तुत प्रबंधात अभ्यासाच्या सोयीसाठी . या व्यक्तींच्या संदर्भात मांडणी केली आहे व महाभारतावर आधारित सर्व महत्त्वाच्या निवडक मराठी साहित्यकृतींच्या आधारे हा अभ्यास केला आहे. महाभारताला मराठी प्रतिभेचा स्पर्श :- महाभारताधिष्ठित अर्वाचीन मराठी ललित साहित्याच्या प्रस्तुत प्रबंधात केलेल्या अभ्यासातून पुढील गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. साहित्यिकांनी प्राधान्य दिलेल्या महाभारतातील कर्ण, ययाती, भीष्म, द्रौपदी, कृष्ण इत्यादी व्यक्तींच्या अनुषंगाने येथे अर्वाचीन मराठी साहित्याचा अभ्यास केला आहे. महाभारताचे मराठी साहित्यिकांना सतत आकर्षण वाटत असून ते वाढते आहे. तसेच मराठी साहित्यिकांच्या विभिन्न दृष्टिकोनानुसार आणि वदलत्या कालमानानुसार महाभारतात भर पडत गेली आहे आणि त्यामुळे महाभारत सतत वाढतच आहे हे या अभ्यासातून लक्षात आले आहे. अर्वाचीन कालखंडात अव्वल इंग्रजी कालखंड, प्रबोधन युगपूर्व कालखंड, व्यक्तिवादाच्या उदयानंतरचा कालखंड आणि स्वातंत्र्योत्तर कालखंड असे जे भिन्न कालसंदर्भ आहेत त्यातून महाभारताकडे पाह- याच्या विविध प्रेरणा दिसून येतात. त्यामध्ये रंजनाची, उद्बोधनाची,' प्रचाराची आणि कलात्मक नवनिर्मितीची प्रेरणा प्रभावी आहे. महाभारतातील 'ययाती' उपाख्यानावर आणि 'कर्ण' या व्यक्तिरेखेवर आधारित साहित्यकृतींची संख्या सर्वांत अधिक दिसून येते. महाभारतातील ययाती उपाख्यानाकडे मराठी प्रतिभेने प्रथमतः लक्ष वेधले व त्या उपाख्यानाचा अनेकपरीने कलात्मक आविष्कार केला ही गोष्ट मराठी साहित्यिकांच्या साहित्यकृतींनी महाभारतात आपल्यापरीने ९२ ...