पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट ( अ ) महाभारताधिष्ठित अर्वाचीन मराठी साहित्याचा अभ्यास ( प्रबंध रूपरेषा आणि निष्कर्ष ) उपोद्घातः- प्रस्तुत प्रबंधात महाभारताधिष्ठित अर्वाचीन मराठी : ललित साहि- त्याचा इ. स. १८५० ते १९७५ पर्यंतचा अभ्यास सादर केला आहे. त्यात मराठी साहित्यिकांनी विविध दृष्टिकोनातून केलेल्या महाभारताच्या आख्यानांचा, नव्या चिंतनाचा आणि कलात्मक अभिव्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. महाभारत हे एक चैतन्यमय आणि म्हणूनच सतत वाढणारे महा- काव्य आहे. ही एक सांस्कृतिक पुराणकथा आहे. महाभारताचे मराठी प्रतिभेला कधीही न संपणारे कुतूहल आहे, जबरदस्त आकर्षण आहे.- म्हणून महाभारतावर आधारित अर्वाचीन मराठी ललित साहित्याची निर्मिती वैपुल्याने झाली आहे. महाभारत वाढीची प्रक्रिया लाक्षणिक अर्थाने अव्याहत चालू राहणार आहे. हे लक्षात घेऊनच महाभारता- सारख्या महाकाव्याच्या सतत होणान्या वाढीचा नवा सिद्धान्त ह्या प्रबंधात प्रस्थापित केला आहे. महाभारतावर आधारित साहित्यकृतीचा या नव्या दृष्टीने मराठीत प्रथमतःच अभ्यास होत आहे. मराठी प्रतिभावंतांनी आपल्या प्रतिभेच्या स्पर्शाने महाभारत कसे फुलविले आहे, हे प्रस्तुत प्रबंधातून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. हा विचार मराठीतील पौराणिक · साहित्याच्या संशोधनातही काही महत्त्वाची भर घालू शकेल असा नम्र विश्वास आहे. .. ९१