पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नवी भरघातली व महाभारत विकसित केले हे सिद्ध करण्यास पुरेशी आहे. कर्णासारख्या उपेक्षितांचे अंतरंग सहानुभूतीने मराठी प्रतिभावंतांनी जाणून घेतले आहे, ही गोष्टही पुरेशी बोलकी आहे. याचा अर्थ मराठी प्रतिभेच्या स्पर्शाने महाभारत काही प्रमाणात उजळले आहे असे म्हणता येते. मात्र महाभारतातील अर्जुन, विदुर, अश्वत्थामा, एकलव्य इत्यादी व्यक्तींच्या जीवन कहाणीकडे अद्याप मराठी प्रतिभेचे लक्ष केंद्रित झालेले दिसत नाही. पण अल्प प्रमाणात का होईना भीष्म, द्रौपदी, धर्मराज, श्रीकृष्ण इत्यादी व्यक्तींच्या जीवन-चरित्राचे नवे आकलन मराठी साहित्यिात केलेले आढळते. अर्जुनासारखी महत्त्वाची व्यक्तिरेखा केवळ स्फुटलेखनातूनच विचारात घेतली आहे. महाभारत हे एक वर्धिष्णू व उपजीव्य महाकाव्य आहे हे सूत्र नव्यानेच या अभ्यासातून लक्षात आले असून वाढण्याची प्रवृत्ती असलेल्या या महाभारताला मराठी साहित्यिकांनी सतत वाढविले अस- ल्याचे दिसून येते. त्यामुळे महाभारतातील कथाभागाचा आणि व्यक्तींचा विकास झालेला दिसून येतो. तो विकास कसा होत गेला, हे जागोजागी स्पष्ट केले आहे. या अभ्यासातून लक्षात आलेले काही स्वतंत्र विचार पुढीलप्रमाणे आहेत. १) महाभारतातील चैतन्य, व्यक्तींचे पारदर्शक आणि बहुमिती व्यक्तित्व, मानवी जीवनाचे व्यापक चिरंतन आणि व्यामिश्र दर्शन, नवनिर्मितीची प्रेरणा देण्याचे सामर्थ्य या कारणांमुळे साहित्यिकांना मनापासून महाभारताची ओढ आणि आकर्षण आहे. २) साहित्यिकांनी महाभारताकडे विविध दृष्टिकोनातून पाहिले आहे. म्हणून महाभारताधिष्ठित साहित्यात त्यांच्या स्व-भावाचे, दृष्टिकोनाचे आणि सभोवतालच्या परिस्थितीचे जिवंत पडसाद उमटले असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. ३) महाभारताच्या सखोल चिंतनातून नवा आशय व्यक्त होण्यासाठी या साहित्यिकांना महाभारताचे पुनर्मंथन करावे लागले, नवी .. ९३