पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

  • * *

त्याच्या मर्यादा यांचा शोध घेणारे ते चिंतनपर महाकाव्य आहे. म्हणूनच मराठी प्रतिभावंतांनी त्यातील कथोपकथांवर आधारित समृद्ध व कला- दृष्या संपन्न ललित साहित्याची निर्मिती केली आहे. महाभारतातील संघर्षाच्या व्यक्तींच्या मुळाशी असलेल्या मूलगामी जीवनप्रवृत्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न या ललित लेखनात आहे. हे या ठिकाणी स्पष्ट होते. कृ.प्र.: खाडिलकरांसारख्यांनी महाभारतातील उपाख्यानात फारसा मूलभूत बदल केला नाही. कच्च देवयानीला भगिनी मानतो तेंव्हा देवयानी त्याला शाप देते, याः कथाभागाला मुरड घालून देवयानीच कचाला आपला भाऊ मानते. देवगुरू प्रमाणेच दैत्यगुरू शुक्राचार्यही ( आपला डाव ) कचाला जामात करण्याचा येथे नव्याने टाकतात. त्यांनी ' शिष्ट संमृत फेरफार' करून स्वतंत्र कथानक साकार केले. शिरवाडकरांची देवयानी, शुक्राचार्यांच्या ऐवजी शाप देते हे त्या नाटकाच्या वास्तवात शिरवाडकरांना भावलेले सत्य आहे.. देवयानीच्या अंगी शाप देण्याचे सामय्यं आहे हे त्यांना पुरतेपणी पटले आहे म्हणूनच त्यांनी हे बदल केले आहेत. पुराणकथेचा ललित साहित्यिकांच्या मनावरील परिणाम आणि त्याच्या मनाने शोधलेला आकार या नव्या बदलासाठी फेरफार करण्यासाठी लेखकाला उद्युक्त करतो. कलात्मक अनुभूतीत त्यांची अपरिहार्यता त्याला जाणवते. महाभारताची वाढ होण्यास लेखकाची ही कालसंदर्भाच्या व व्यक्तिसंदर्भाच्या प्रकाशात नवा अर्थ शोधण्याची प्रक्रियाच कारणीभूत आहे हे ययाती उपाख्यानाने सिद्ध केले आहे.. 'संजीवनी मंत्राचा उच्चार करतांना तुझे स्मरण होऊन मी गहिवरेन.' ही ध्येयनिष्ठुर कचाने देवयानीला दिलेली कबुली आजही रसिकवाचकांच्या मनात हळुवार स्पंदन उमटवू शकेल. पूर्वपरिचित कथेतून शाश्वत जीवनमूल्यांचा कधीही न संपणारा शोध येथे घेतलेला दिसतो. हेच पुराणकथेच्या ययाती उपाख्यानाच्या आकर्षणाचे कारण आहे.