पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पौराणिक कथेत नवा प्राण कशा तऱ्हेने भरता येतो आणि एखादी पुराणकथा लेखकाला कधी भारून टाकते याचा प्रत्यय खांडेकर, शिर- वाडेकर, पाडगावकर, यांच्या साहित्यातून येतो. माडखोलकरांचे 'देवयानी' नाटक, मुळात त्यांची प्रतिभा नाट्यानुकूल नसल्याने, यशस्वी झाले नसले तरी त्यांची देवयानीच्या संदर्भातील शोकनाट्याच्या नायिकेची जाणीव येथे महत्त्वाची आहे. पाडगावकरांची शर्मिष्ठा, ती केवळ अपूर्व आहेत. तर शिरवाडकरांना जाणवलेले कचदेवयानी चे अत्युत्कट प्रेम किंवा शर्मिष्ठेविषयीची अनुकंपा लक्षणीय आहे. खांडे- करांचा 'ययाती' तर फार मोठा संदेश (कलात्मक पातळींची बूज राखून) देऊन जातो. तो नुसता कामी 'ययाती' नाही तर सर्व प्रलोभना- वरच संयमाचा लगाम घालण्याची आवश्यकता सुचवितो. ययाती-यंती- कच - शर्मिष्ठा - देवयानी - पुरु- मंदार या सगळंघाच व्यक्तिरेखांना खांडेकर आपल्या कथेत नव्याने जिवंत करतात. त्यांना नवे अर्थ प्राप्त करून देतात आणि त्या आधाराने मानवी मनाचा व जीवनाचा नवा संदर्भ उलगडून दाखवतात. मराठी साहित्यात 'ययाति' कादंबरीचे हे यश अभूतपूर्व आहे. पौराणिक कादंबरीचे नवे पर्व निर्माण करणारे आहे. मराठी ललित साहित्यात कर्णावरील साहित्यकृतींच्या खालोखाल ययाती उपाख्यानावरील साहित्यकृतींची संख्या भरते. यावरून या उपाख्यानाची लोकप्रियता स्पष्ट होते. मराठी प्रतिभावंतांनी आपल्या प्रतिभाबलाने ययाती उपाख्यान- कथेत विशेष मोलाची भर टाकली, एवढेच नव्हे तर महाभारतातील ययाती उपाख्यानात नवा प्राण भरून त्याचे पुनरुजीवन केले असे म्हणता येईल. व्यक्तिरेखा, घटना प्रसंग, कथानकाला मिळत गेलेली कलाटणी या सर्वच बाबतीत हे साहित्य म्हणजे नावीन्यपूर्ण आविष्कार आहेत. मराठी ललित लेखकांनी या व्यक्तींचे केलेले चिंतन, आणि त्या निमित्ताने केलेले विचारमंथन, व कथानकात केलेले फेरफार यामुळे महाभारतातील हे उपाख्यान सर्वांगांनी विकसित झाले आहे असे म्हणता येते. महाभारत हे एक अभिजात, वर्धनशील महाकाव्य आहे. माणसाचे सामर्थ्य आणि २०.८९