पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्राशन करून चित्रलेखा आत्मसमर्पण करते. ययातीचे खाडकन डोळे उघडावेत, असे हे 'आत्मसमर्पण आहे. चित्रलेखेच्या जीवनकहाणीची कल्पना आणि तिचे आत्मसमर्पण यातील गिरीश कार्नाडांना उलगडलेला नवा अर्थ म्हणजे त्यांचे हे नाटक आहे. नव्या अर्थप्राप्तीने, पुराणकथेतून नवा आशय कलात्मक पातळीवरून व्यक्त झाला आहे. तेव्हा गिरीश कार्नाडांच्या या नाटकाकडे लक्ष वेधण्याचे कारण हीच एक प्रवृत्ती आता मराठी पौराणिक साहित्यात रूढ झाली आहे. त्यामुळे महाभारताचे नवे नवे आविष्कार होत आहेत आणि नव्या अर्थाने, नव्या संदर्भात प्रतिपादन होत आहे. त्यातूनच या वधिष्णू महाकाव्याची सतत वाद चालूच आहे हे लक्षात येते. समालोचन:- महाभारतातील 'कचदेवयानी' आख्यानापेक्षा 'ययाती उपाख्यान' मराठी ललित लेखकांना विशेष आवडलेले दिसते. कारण कच देवयानी उपाख्यानापेक्षा, ययाती उपास्थानावर आधारित ललित कृतींची संख्या अधिक आहे. कचदेवयानी उपाख्यानावर 'विद्याहरणा सारखे खाडिलकरांचे नाटक विशेष गाजलेले व नवा मानदंड ठरणारे आहे, तर ययाती उपाख्यानावर भाऊसाहेब खांडेकरांची 'ययाति' कादंबरी, शिरवाड- करांचे 'ययाति आणि देवयानी' नाटक, गिरीश कार्नाड यांचे 'ययाति' नाटक, पाडगावकरांची काव्यात्म 'शर्मिष्ठा' या विशेष गाजलेल्या व कलात्मक गुणांच्या दृष्टीनेही सरस ठरलेल्या साहित्यकृती आहेत. मराठी लेखकाचे लक्ष या उपाख्यानाने नव्या ललित साहित्य निर्मिती- साठी वेधून घेतले. या घटनेत मराठी प्रतिभेच्या नवोन्मेषाचा ' प्रत्यय येतो. ययाती उपाख्यानावर नाट्यनिर्मिती अधिक झालेली आहे. याचे कारण या महाभारतीय उपाख्यानातील संघर्ष, व्यक्तींच्या स्वभाव रेखा, ( ज्या परस्पर संवादी व विसंवादी आहेत.) व नाट्यानुकूलता हे आहे.