पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुसंवाद राखतात. गिरीश कार्नाड एखादा विशिष्ट संदर्भ वा समस्या घेऊन त्या दृष्टीतून नाटक लिहीत नाहीत. उलट एखादी पौराणिक घटना जेंव्हा त्यांच्या मनावर विशेष परिणाम घडविते त्यावेळी त्यातून नाटय- कृती घडते. 'ययाती' मध्ये जे जिवंत नाट्य साकार होते याचे रहस्य हेच आहे. मराठीतील श्रेष्ठ पौराणिक कलाकृतीतही याच गोष्टीचा प्रत्यय येतो. महाभारतातील कथानक, व्यक्ती, घटना लेखकांच्या मनावर परिणाम करतात आणि त्यातूनच या संपन्न साहित्यकृतींची निर्मिती झालेली आढळते. या कथानकात कार्नाडांचे लक्ष अखेरच्या प्रसंगाने विशेष वेधून घेतलेले दिसते. पितापुत्रातील आपापली वये बदलण्याचा प्रश्न ( Transplantation of Age ) त्यांना विशेष करून भावला. यातून त्यांनी माणसाच्या वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारीचा प्रश्न निर्माण केला. पौराणिक कथेतून ( Myth ) नवी अभिव्यक्ती साध- ण्याचा त्यांचा येथे प्रयत्न आहे. ययातीची सून, पुरुची पत्नी 'चित्रलेखा' हिच्या भावनांची विशेष कदर या नाटकात नाटककाराला करावयाची आहे. त्यातून नवे प्रश्न आणि संदर्भ निर्माण करावयाचे आहेत. " 'चित्रलेखे' ची कहाणी :- , राजा ययातीने आपल्या पापाचे गाठोडे बिचाऱ्या पुरूवर लादले हीच खरी चित्रलेखेची तगमग आहे. म्हणून ती ययातीला रोखठोक.. परखड सवाल विचारते. एक सून सासन्याला सरळ म्हणते, 'तुम्ही माझ्या पतीचे योवन हिसकावून घेतलंत...त्या यौवनाला चिकटलेल्या इतर गोष्टींचा स्वीकार करणं आता तुम्हाला क्रमप्राप्त आहे.' (पृ. ८१ ) 'सामान्यांच्या नीतीच्या सापळ्यात आपल्या सारख्यांनी का अडकून पडावं ? ' निरूत्तर करणारी ही प्रश्नमालिका आहे. शेवटी विष ... ८७