पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जागते. तिची तिला ओळख पटते. ययाती - शर्मिष्ठा मीलन होते. येथे महाभारताच्या या उपाख्यानातील एक अनुभवबिंदू हळुवार पणे कवीं पाडगावकरांनी टिपला आहे. हा महाभारतीय ययाती उपाख्यानाचा एक कलात्मक आविष्कार आहे. पाडगावकरांची प्रतिभा ययाती शर्मिष्ठेच्या व्यक्तित्वाला नवा अर्थ प्राप्त करून देते. प्रणयाच्या वा सूडाच्या भावनेला समर्थपणे अभिव्यक्त करते. कार्नाडांचे अनुवादित नाटक :- अनुवादित साहित्यकृती येथे अभ्यासात घेतलेल्या नसल्या तरी ज्या अनुवादाचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही असे कानडी नाटककार श्री. गिरीश कार्नाड यांचे 'ययाति' नाटक आहे. या नाटकाचा मराठी अनुवाद श्री. रं. भिडे यांनी १९७१ मध्ये केला आहे. नव्या मूल्यांसाठी पुराणकथा :- कार्नाडांच्या 'ययाति' ने पौराणिक कथानकावर आधारित साहि- त्याची नवी परंपराच निर्माण केली. पूर्वापार चालत आलेले स्वरूप आणि दृष्टिकोन यात बदलला आहे. नव्या मानवी मूल्यांच्या चित्रणा - साठी पुराणकथा येथे स्वीकारली आहे, पौराणिक संदर्भाची नव्याने तपासणी करून त्यातून काही नवीन मूल्यांचा मागोवा घेण्याची, नव्या धर्तीवर विश्लेषण करण्याची प्रथा रूढ झाली आहे. पौराणिक कथेच्या आधाराने जीवनाचा नवा संदर्भ मांडणारी ही नाट्यकृती आहे. आजच्या ललित साहित्यात हा एक नवा पायंडाच आता पडला आहे. ययाती आख्यानाच्या विचारमंथनातून गिरीश कार्नाड एक नवा संदर्भ निर्माण करतात; नवा निष्कर्ष मांडतात. पुराणकथा अनुभवाशी जेव्हा एकरूप होते तेव्हा ती कलारूप घेते. ती पुराणकथा ग्राह्य बनते. भारतीयांना तर ती केवळ ग्राह्यच नव्हे तर आस्वाद्यही वाटते. म्हणून प्राचीन मराठीतील बखरीही पुराण पद्धतीने आपला इतिहास सांगतांना दिसतात. कारण पुराणकथा जनरूचीशी ८६...