पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिले. कोसळणान्या देवयानीने माझा आधार शोधला... ही त्याची तीव्र जाणीव आहे. देवयानीला शुक्राचार्यांच्या उग्र तपःसामर्थ्याचा आधार आहेच. अहंतेच्या कंफात जखमी स्वप्ने बुडविणारी देवयानी आणि मदि- रेच्या कैफात आपली सारी जाणीव बुडविणारे शुक्राचार्य, ययातीला हे वेळीच उमगते रसरसलेले योवन हवे म्हणूनच ययाती, शर्मिष्ठेला जवळ करतो. महाभारताशी हा ययाती जवळचा आहे. शुक्राचार्यांना दिलेल्या वचनाचे हा ययाती, भान ठेवतो आणि महाभारतातील शर्मिष्ठाही युक्तिवादाने त्याला जाळ्यात पकडते. पाडगावकरांचा ययाती येथे अष्टावधानी बनतो. त्याला देवयानीचे खरे रूप उमजले आहे. सूडाने पेट- लेल्या शर्मिष्ठेला जाणून बुजून तो सामोरा जातो. तिच्या स्वराने आणि लावण्याने त्याला येथे खेचून आणले आहे. देवयानीच्या अहंकारांने ( खरं म्हणजे स्वतःच्याच क्रूरकर्माने ) दासी झालेली शर्मिष्ठा येथे नव्याने साकार होते केवळ पित्यासाठी नाइलाजाने तिने दास्य पत्करले आहे अशी शर्मिष्ठेची नवीनच कैफियत पाडगावकर मांडतात. त्यामुळे त्यांचा शर्मिष्ठेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि भूमिका संपूर्णपणे वेगळीच आहे हे लक्षात येते. ययातीच्या आवाहनाला साथ देतांना या शर्मिष्ठेच्या मनात भीती आहे. तिचे अनामिकपण संपून जाते. शुक्राचार्यांच्या शब्दांचे स्मरण ठेवणारा 'ययाती' येथे प्रेमप्रसंगीही सावध आहे. हे शर्मिष्ठेला अन- पेक्षित असे याचे रूप आहे. उघड्या डोळ्यांनी ती आता ययातीला स्वीकारू शकत नव्हती पण ययाती जाणीवपूर्वक ( सारे स्मरून, पुन्हा विसरून) शर्मिष्ठेला स्वीकारतो. ययाती - शर्मिष्ठेच्या मीलनाचे रंगतदार चित्रण येथे कवीने रेखाटले आहे. प्रत्यक्ष देवयानी येथे नाही तर तिच्या अस्तित्वाची जाणीव 'मोठ्या सूचकतेने कवीने करून दिली आहे. शेवटी शर्मिष्ठा सत्याला ८५