पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फायदा घेऊन जें दासीपण तिला पत्करायला लावले- भोग भोगायला लावले ते शल्य आणि मनातील दुःख येथे व्यक्त होते. मग स्वप्नाळू प्रणयिनीची भूमिका संपून सूडाला उद्युक्त झालेल्या शर्मिष्ठेचे चित्र येथे येते. 'मी माझ्या अपमानाचा घेइन सूड सूडातच त्या कृतार्थता स्वप्नांची । असे मानणारी ही शर्मिष्ठा आहे. नवा संघर्ष : नवी कल्पकता :- पाडगावकरांना जाणवलेल्या संघर्षात 'अनुराधा' या काल्पनिक व्यक्तिचित्राला महत्त्व प्राप्त होते. अनुराधा, शर्मिष्ठेच्या मनात पेटलेल्या सूडाला विझवू पाहते पण शर्मिष्ठा म्हणते, 'मी या सूडावाचून तडफडेन! ' अनुराधेला दासीपणाच्या जगण्याहून मरण बरे असे शर्मिष्ठेतील 'राजकन्या' जागी होऊन सांगते. निदान सुडाने पेटलेल्या या शर्मिष्ठेला ययातीने तरी साथ देऊ नये म्हणून अनुराधेची सारी धडपड व्यक्त होते. पाडगावकरांनी समर्थपणे रंगविलेली काल्पनिक ' 'अनुराधा' आणि कल्पनेनेच येथे रंगविलेली शर्मिष्ठेची सूडाची भावना हे सगळेच नव्या संघर्षाला जन्म देते. शर्मिष्ठेच्या मनात खोलवर कवी येथे डोकावतांना दिसतो. सखी अनुराधेची छायाकृती ययातीला थोपवून त्याला देवगतीची जाणीव करून देते. पण ययातीला सुख... अधिक सुख... नव्या सुखाचा, धुंद कैफात बुडविणान्या सुखाचा हव्यास आहे. कैफ - कैफासाठीच आहे. मनातील भयाण पोकळीपासून पळून जाण्यासाठी आहे. हे ययातीचे देवरूपी छायाकृतीला सादर होणे आहे. आसक्तीत तो सारे विसरू शकतो. ययातीची व्यथा येथे प्रभावीपणे पाडगावकर साकार करतात. देवयानीची वंचना यात होते याची जाणीव जेव्हा ती छायाकृती करून देते, तेव्हा ययाती आपली मनोव्यथा व्यक्त करतो. कचाला सर्वस्व अर्पण केलेली ही देवयानी 'कळी एकदाच फुलते' तशी देवयानी एकदाच कचासाठी फुलली, अहंतेच्या कैफात तिने उरलेले सर्वस्व मात्र मला ८४