पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केंद्रित झाले आहे. शर्मिष्ठेच्या प्रेमाचे हे रूप एवढ्या उत्कटतेने मूळ उपाख्यानात व्यक्त होत नाही. तो कथाभाग जाणून घेऊन कवीने त्याचा विकास येथे केला आहे. पाडगावकरांची ही 'शर्मिष्ठा' महाभारतातील शर्मिष्ठेचे भावविश्व अधिक खोलात शिरून चित्रित करते. महाभारतात एवढद्या प्रचंड विषयांच्या व्याप्तीत शर्मिष्ठेच्या अंतरंगातील नाजुक धाग्यांना फुलवावयाचे, पूरक काम पाडगावकरांनी येथे केले आहे. हे असेच, मर्ढेकरांचा 'कर्ण' किंवा : वा. रा. कांताचे 'मरणगंध' पूरक रंग घेऊन मराठी साहित्यात अवतरले आहे. ययातीउपाख्यानाचा आगळा आविष्कार :- पाडगावकरांच्या संगितिकेतील 'शर्मिष्ठे' चा प्रियकर ययातीच्या रूपात येथे येतो. तृषार्त ययातीला तृप्त करणारी ही शर्मिष्ठा आहे. देवयानीचा मदनतुल्य पती, ज्याला सूर्याची अस्मिता आहे आणि ज्याचा. पराक्रम वज्रासारखा आहे तो नृपश्रेष्ठ ययाती येथे शर्मिष्ठेशी संवाद करीत आहे, हा प्रीति-संवाद आहे. शर्मिष्ठेलाही आपल्या कृतकर्माची खंत आहे. तिलाही वाटते की सुखस्वप्नांच्या हिरवळीवर बागडणाऱ्या देवयानीला दुःखाच्या खोल कूपात पुन्हा एकदा मी लोटून देईन आणि यावेळी मात्र ययातीचा बलशाली कर तेथे पोहचू शकणार नाही. शर्मिष्ठेच्या अंतरंगात कवी पाडगावकरांनी येथे प्रवेश मिळविला आहे. त्यांनी प्रथमतः शर्मिष्ठेला आपण देवयानीची वंचना करतोय ही जाणीव झाल्याचे चित्रित करून या उपाख्यानात एक नवा रंग भरून उत्कट भाव संघर्ष निर्माण केला आहे. त्यामुळे शर्मिष्ठेचे मनोविश्लेषण - करतांना कोणत्याही प्रेयसीच्या मनातील कातरता त्यांनी समर्थपणे व्यक्त केली आहे. पाडगावकरांसारख्या ललित साहित्यिकांच्या या नव्याकल्पना महाभारताचा एका विशिष्ट अंगाने विकास करतात आणि आपल्या स्वतःच्या जाणिवा त्यातून मार्मिकपणे व्यक्त करतात. शर्मिष्ठेच्या मनात सूडाचा विचार डोकावतो व तो ती आपली सखी अनुराधा हिच्याजवळ बोलून दाखविते. देवयानीने परिस्थितीचा ...C3