पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिला आहे. माडखोलकरांची ही 'भग्नाश' देवयानी मराठी ललित साहित्यात निःसंशय लक्षणीय आहे. मंगेश पाडगावकरांची 'शर्मिष्ठा' :- महाभारतातील या उपाख्यानावर आधारित मंगेश पाडगाव- करांची ' शर्मिष्ठा' ही १९५६ साली, प्रथमतः मौज दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. ती पुस्तक रूपात १९६० साली प्रकाशात आली. आपल्या काव्यात्म, भावोत्कट शैलीत मंगेश पाडगावकरांनी ययाती, शर्मिष्ठा, आणि तिच्या सख्या (आणि एक छायाकृतीही) यांचा नाट्यपूर्ण संवाद काव्यरूपात सादर केला आहे. येथे काव्यविचारापेक्षा पाडगावकरांच्या कल्पना विश्वातील 'शर्मिष्ठे' चा विचार करावयाचा आहे. प्रणयिनी शर्मिष्ठा :- मंगेश पाडगावकरांनी आपल्या स्वतःच्या भावविश्वाला ययाती- उपाख्यानातून साकार केले आहे. 'शर्मिष्ठा' त्यांना प्रणयिनीच्या रूपात जाणवते. ही 'शर्मिष्ठा' अबोल विहगाची स्वामिनी आहे. एका तृष्णेला शांत करून नव्या तृष्णेला जन्म देणारी आहे. ही प्रणयिनी शर्मिष्ठा आपल्या एकलेपणाचा आवेग मिठीत बुडविणारी आहे पण ... 'प्रीतीच्या भाळी शाप वेदनेचा प्रीतीच्या स्पर्शाने उध्वस्तच व्हावें जीवन हीं नियती । ' हेच तिच्या अनुभवाला येते. तिच्या 'धुंद गाढ आलिंगनांत । विफलतेची वेदना विरून जाते ।' अशी कबुली ययातीही देतो. प्रणयिनी शर्मिष्ठा ययातीची आतुरतेने वाट पाहते. त्याच्यासाठी झुरते, तळमळते, तिच्या निशिगंधाने दरवळलेल्या रात्री शून्य आणि रित्या करणारा हा ययाती आहे. तिच्या अनुक्त प्रीतीने 'तुटून पिसें पडलेल्या विकल क्षणांची धडपड अनुभवली आहे; 'माझी प्रीती मलाच छळणारी शाप झाली ' हो विरहिणी शर्मिष्ठेची व्यथा मोठ्या उत्कटतेने पाडगावकर व्यक्त करतात. ययाती उपाख्यानातील उत्कट प्रणयभावनेचे सारे रंग मंगेश पाडगावकर या काव्यात चित्रित करतात. तेवढ्यासाठी त्यांचे लक्ष ' शर्मिष्ठे' वर ८२...