पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यांनी लिहिले ही गोष्ट विशेष लक्षणीय आहे. संस्कृत साहित्यिकांच्या अवलोकनातून ही गोष्ट सुटलेली आहे. हे नमूद केल्यावर मराठी साहित्यिकांच्या स्वतंत्र कलादृष्टीचे महत्त्व पटते. सर्जनशील उपाख्यान:- महाभारतातील 'कच ययाती' उपाख्यान हे मराठी प्रतिभा- वंतांच्या सर्जनशीलतेला आव्हान ठरले आहे. कर्णाच्या कहाणीप्रमाणेच कच - ययातीची कहाणी मराठी साहित्यिकांना आकर्षून घेते. कर्ण विषयक साहित्याप्रमाणेच ययाती, कच उपाख्यानांवर आधारित मराठी ललित लेखन विपुल आहे. विपुलतेबरोबरच त्यात वैविध्य व वैचित्र्यही आहे." विविध साहित्य प्रकारांच्या माध्यमातून हे उपाख्यान अवतरले आहे. अर्वाचीन कालखंडात म्हणजे इ. स. १८५० पासून १९७५ पर्यंतच्या काळात या उपाख्यानाविषयीचे कुतूहल, मराठी ललित लेखकात पुष्कळ दिसून येते. यावरून या उपाख्यानाची सर्जनशीलता ध्यानात येते. या उपाख्यानावर आधारित साहित्यकृती लोकप्रिय व लोकमान्य तर ठरल्याच पण कलामूल्यांच्या दृष्टीनेही सरस लक्षवेधी ठरल्या आहेत. कचोपाख्यानाचा समर्थ आविष्कार म्हणून खाडिलकरांचे 'विद्याहरण' तर ययाती उपाख्यानाचे समर्थ व कलात्मक आविष्कार म्हणून वि. स. खांडेकरांची 'ययाति' मुळातच आहेत. ययाती. उपा- 'उत्तरयायात ' हा ययातीच्या उत्तर आयुष्याशी संलग्न ख्यानात भाग आहे. पहिल्या कचोपाख्यानात कच, देवयानी, शुक्राचार्य, वृषपर्वा यांना महत्त्व आहे. कच शुक्राचार्यांकडे विद्या शिकण्यासाठी विद्यार्थी म्हणून राहतो आणि संजीवनी विद्या हरण करुन निघुन जातो; ही सर्व हकिकत पहिल्या भागात येते. मराठी ललित साहित्यात या दोनही भागांवर आधारित साहित्य- कृतींची निर्मिती झाली आहे. कचोपाख्यानावर आधारित साहित्यात नाट्याचार्य खाडिलकरांचे ' विद्याहरण' ही प्रमुख साहित्यकृती आहे. या २