पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कचोपाख्यानातील व्यक्तिचित्रे उपाख्यान- विचार:- महाभारताधिष्ठित अर्वाचीन मराठी ललित साहित्याचा अभ्यासात 'ययाती' या महत्त्वाच्या व सर्वात अधिक मराठी ललित साहित्यकृतींना जन्म देणान्या उपाख्यानाचा विचार प्रस्तुत ठिकाणी केला आहे. वि. स. खांडेकर आपल्या 'ययाति' कांदबरीच्या प्रास्ता- विकात 'ययाती कथा हे उपाख्यान असल्यामुळे महाभारतापेक्षा आणखी स्वातंत्र्य घेण्यास वाव आहे' असे म्हणतात. ऐस्वीकारार्ह मत आहे. ललित साहित्यिकाला उपाख्यानात कल्पनाविलासाला अधिक वाव मिळतो किंवा स्वातंत्र्य घेता येते. मूळकथेत प्रक्षिप्त ठरणान्या आख्यान उपाख्यानाचा ज्ञात तपशील, तोंडावळा तसाच टिकवून त्यात स्वतःचे रंग भरण्याचे स्वातंत्र्य ललित लेखकाला आहे. एखाद्या मेकॅनोच्या खेळासारखी ललित लेखक नवी नवी जुळणी पुराणकथांची करीत असतात. लेखकाच्या नव्या शोधानुसार ( Findings) त्याला विशिष्ट सूत्र किंवा आकृतिबंध गवसलेला असतो. महाभारतातील उपाख्यानांचा कलात्मक आविष्कार म्हणून कालिदासाच्या 'अभिज्ञान शाकुन्तलम् ' नाटकाचा एक आदर्श उदाहरण म्हणून विचार करता येईल. त्यात ललित लेखकाला स्वातंत्र्याची सनद मिळाली आहे. उपाख्यानांची काव्यानुकूलता जोखून कालिदासाने आपल्या प्रतिभाबलाने एक समर्थ कलाकृती निर्माण केली आहे. अशा अजरामर कलाकृतीची निर्मिती पुराणकथेतून संभवनीय असते. मराठी प्रतिभेने एक फार मोठा पल्ला 'कच, ययाती, देवयानी, शर्मिष्ठा' या उपाख्यानाच्या कलात्मक अभिव्यक्तीतून गाठलेला आहे. कचदेवयानी, ययातीशमष्ठा उपाख्यानाची काव्यानुकूलता आणि कलात्मकता जाणून घेण्याची कलात्मक दृष्टी (Artistic Vision) मराठी प्रतिभावंतांजवळ आहे. प्रथमतः या उपाख्यानाचे वाङमयीन मोल जाणून 1