पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

2 शिवाय 'कच देवयानी नाटक '1 'देवयानी अर्थात विद्यासाधन, संगीत संजीवनी नाटक 'संजीवनीहरण' नावाचे नाटक व खंडकाव्य, इत्यादी साहित्यकृती प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यात कचाचे 'संजीवनी विद्याहरण' कथानक आले आहे. कच, देवयानी, शुक्राचार्य, वृषपर्वा या व्यक्तींना महत्त्व मिळाले आहे. ययाती उपाख्यान हा जो दुसरा भाग आहे. त्यात कच, देवयानीला 'कोणताही ऋषिकुमार तुझ्याशी विवाहबद्ध होणार नाही असा शाप देतो' यापुढील कथाभाग आलेला आहे. त्यात देवयानी शर्मिष्ठा कलह, देवयानीचे ययातीकडून पाणिग्रहण, ययातीशमिष्ठा-प्रणय, देवयानी- शुक्राचार्यकोप, ययातीला वार्धक्याचा शाप, पुरुकडून ययातीच्या वार्धक्याचा स्वीकार इत्यादी प्रसंग आलेले आहेत. या कथानकात ययाती, देवयानी, शर्मिष्ठा, पुरु, शुक्राचार्य, कच या व्यक्तिरेखांना महत्त्व आहे. ययाती उपाख्यानावर वि. स. खांडेकरांची 'ययाति' ( ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ) कादंबरी, गिरीश कार्नाड यांचे 'ययाती' नाटक, वि. वा. शिरवाडकरांचे 'ययाति आणि देवयानी' नाटक आधारित आहे. 'ययाति' (१९५९) कादंबरीच्या निर्मितीनंतर ययाती उपाख्यानाला विशेष बहर आला असून काही लेखकांनी आपल्या साहित्यकृती ययातीच्या आधाराने निर्माण केल्या आहेत. कच व ययाती उपाख्यान असे दोन भाग कल्पून प्रस्तुत ठिकाणी विवेचन केल्यास अधिक सोयीचे व सुसंगत होईल म्हणून तोच मार्ग अवलंबिला आहे. तत्पूर्वी कच देवयानी ययाती शर्मिष्ठा उपाख्यान महाभारतात कां व कसे आले हे संक्षिप्तपणे पाहणे आवश्यक आहे. 4 'आमचा पूर्वज ययाती' कौरवांचा 'वंशकर' म्हणून दुष्यन्त शकुन्तला उपाख्यान महा- भारतात येते त्याचप्रमाणे 'आमचा पूर्वज ययाती' याला शुक्राचार्यांची गद्यपद्यात्मक कचदेवयानी नाटक सं. कचदेवयानी नाटक

.स. बा. सरनाईक, (१८८७)
वि. भि. कापरेकर, (१८९२)

३...