पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अशा या नव्या विचारांची व नव्या कल्पनांची पेरणी महाभारतातील ययाती उपाख्यानात करून मराठी ललित लेखकांनी महाभारताची वाढ केली आहे. साहित्यिकांच्या हातून कळत नकळत ते घडते. शेवटी अपेक्षाभंग झालेली 'देवयानी' च माडखोलकरांच्या मनाची पकड घेते. स्वतःला अभागी आणि अविचारी माता म्हणवून घेणारी देवयानी माडखोलकरांच्या लेखनाचे केंद्र होते, म्हणूनच या नाटकाचे नाव 'देवयानी' असावे. देवयानीच्या मनाचा अंतर्मुख होऊन माड- खोलकर येथे विचार करतात. तिचे करूण - भावविश्व उत्कटतेने चित्रित 31 करतात पण हे चित्र पूर्वीच्या तिच्या सगळ्या तडजोडीशी विसंगत आहे. खांडेकर, शिरवाडकरांनी रंगविल्याप्रमाणे अहंकारी देवयानी माडखोलकर चित्रित करीत नाहीत. नाटकाच्या अखेरच्या प्रदीर्घ स्वगतातून देवयानीच्या सान्या भावनांची आंदोलने येथे प्रकर्षाने साकार होतात. 22 अशी ही माडखोलकरांची 'देवयानी' मानवी जीवनावर प्रकाश टाकते. नवे चिंतन साकार करते. पण कलात्मकतेचा, भव्यतेचा स्पर्श येथे ययाती उपाख्यानाला होत नाही. महाभारतातील ययाती उपाख्याना- वर आधारित साहित्य निर्मितीचा एक प्रयत्न म्हणून माडखोलकरांच्या या नाटकाचे महत्त्वाचें वैशिष्ट्य म्हणजे 'देवयानी' येथे केंद्रस्थानी कल्पलेली असून तिच्या अहंकाराऐवजी असहाय्यतेवर चित्रणात भर 31 देवयानी: 'देवयानी, काय बालं अखेर हें तुझ्या कपाळी? तुझा ज्येष्ठ पुत्र सम्राटपदाला मुकला, तुझी सवत-ती धूर्त दानवकन्या- राजमाता होऊन बसली आणि इतके दिवस तुझ्या धाकांत असलेला तुझा कामुक पति उद्या पुन्हा तरूण झाल्यावर कामक्रीडेच्या मृगजळांत मोकाट मनानं हुंदडणार!' (अंक ३, प्र. ३, पृ. ८५) 82 'पुरूष हा राजर्षि असो किंवा ब्रह्मर्षि असो तो जात्याच बहुस्त्रीक आणि बहुभोगी आहे. स्त्रीकडे तो केवळ एक भोग !वस्तु म्हणून पाहतो - माणु- सकीचं मूल्य सुद्धा तो स्त्रीला द्यायला तयार नाही. ( अंक ३, प्र. ३, पृष्ठ ८५ ) ... ८१