पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यक्तींवर माडखोलकर प्रेम करतात म्हणून प्रत्येकाची भूमिका ते आवर्जून येथे मांडू शकतात. नाट्यलेखनाला माडखोलकरांची प्रवृत्ती प्रतिकूल आहे, त्यामुळे कादंबरीला अनुकूल अशाच कथाभागाचे चित्रण ते येथे करतात. नाट्यगुणांचा अभाव येथे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. देवयानीचा अपेक्षाभंग :- शुक्राचार्यांकडून मिळालेल्या उःशापानुसार देवयानी जेव्हा आपल्या . पोटच्या मुलांना वृद्धत्व पत्करण्यास सांगते तेव्हा तिचा दारूण अपेक्षाभंग होतो. उलट तिलाच यदू म्हणतो - 'आपल्या तरूण पुत्राला पित्याचं म्हातारपण पत्करायला सांगणं यात तरी कोणता मातृधर्म आहे देवी ? 29 येथे तर उघडच माता आणि पुत्र यांच्यात विरोध निर्माण होतो. चकमक झडते. देवयानीला आपली सर्व मुले नकार देतात तेव्हा 'आमच्या पोटच्या गोळयानं बोलावं का असं आम्हाला? ' हे उद्गार ती काढते. ययातीसुद्धा स्वार्थीवृत्तीने म्हणतो... 'काय कृतघ्न पोरं आहेत! यापैकी एकालाही राज्यपद मिळणार नाही माझं-' सगळेच संगनमत करून मुलाचे तारूण्य हिरावून घेत आहेत अशी स्थिती येथे आहे. मुलांना स्वतःचे जीवन स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे. त्यावर कोणी गदा आणू नये हे येथे ययातीची मुले सुचवितात. शेवटी पुरू आपले तारूण्य द्यायला तयार होतो. पुरू हा ज्येष्ठ पुत्र आहे हे गृहीत धरून विशेष काम साधले याचा उलगडा होत नाही. ययातीच्या वार्धक्याच्या निमि- ताने येथे शर्मिष्ठा मोठे सूचक उद्गार काढते माणसाला क्रमाक्रमानं हळु हळू चोर पावलांनी नकळत म्हातारपण येतं, म्हणूनच सहन करू शकतो तो जरेचे आपल्यावर पडणारे विदारक विनाशक 280 येथे म्हातारपणाच्या भयंकर अवस्थेची जाणीव तीव्रपणे होते. पाश. काय झालं? त्याचा उबग कसा येईल मला? महाराज, आपण तरुण असा की म्हातारे असा, या देवयानीला सारखेच प्रिय आहात आपण. ' देवयानी : ग. त्र्यं. माडखोलकर, १९६४, (अंक ३, प्र. ३, पृष्ठ ७०-७१ ) 2. देवयानी: ग. त्र्यं. माडखोलकर, (अंक ३ प्र. ३ पृ. ७४) ३० देवयानी: ग. त्र्यं. माडखोलकर, (अंक ३, प्र. ३, पृष्ठ ७७ ) ८००