पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ष्ठेची शय्यासोबत न करण्याविषयी बजावतात. शर्मिष्ठेलाही त्यांनी तशी ताकीद दिलेली आहे. पण माडखोलकरांनी या कथाभागाचे स्वतंत्र चितन येथे केले आहे. वयात आलेल्या कुमारिकेचा जर वडील माणसांनी वेळेवर विवाह करून दिला नाही, तर तिला स्वयंवर करण्याचा धर्म- शास्त्राप्रमाणे अधिकार आहे. शर्मिष्ठेने जे केले ते तिच्या वयाला आणि परिस्थितीला साजेसे असे योग्यच केले. ग. त्र्यं. माडखोलकरांनी आजच्या नव्या परिस्थितीला अनुलक्षून हा विचार मांडला आहे. शर्मिष्ठेविषयी मध्यमवर्गीयांच्या दृष्टिकोनातून ते पाहतात. त्यांना येथे मुख्यतः देवयानीची व नंतर ययातीची चूक लक्षात येते. या नाटकातील शुक्राचार्य ययातीचे 'राजेपण' मान्य करतात आणि शर्मिष्ठेलाही न्याय देतात. 'स्त्री जात म्हणजे मूर्तिमंत असूया तर पुरुषजात म्हणजे मूर्तिमंत कामुकता ! ' या नव्या चिंतनाचा बोध माडखोलकरांनी या कथेच्या निमित्ताने येथे करून दिला आहे. लेखक- परत्वे महाभारताकडे पाहण्याच्या भिन्न भिन्न दृष्टिकोनाची प्रचीती येथे येते. या प्रत्येकाच्या नव्या चिंतनातूनच महाभारताचा सर्वांगीण विकास होतो. या नाटकात शर्मिष्ठा आपल्या कर्माचे प्रायश्चित्त भोगायला तयार आहे. नाटकातील संघर्ष तिच्या अशा प्रकारच्या चित्रणामुळे फिका होतो. भोगवादी वृत्ती बळावल्या जाऊ नयेत, त्यासाठी शासन होणे आवश्यक आहे ही देवयानीची भावना आहे. या नाटकात सगळयाच व्यक्तींनी समजूतदारपणा, व पश्चात्तापदग्ध होऊन शासन भोगण्याची तयारी दाखविल्यामुळे नाटकाचा आत्मा असलेला संघर्ष संपुष्टात येतो. शापाने वृद्ध झालेल्या ययातीवर देवयानी पुन्हा प्रेम करू लागते. येथे देवयानी पूर्णतः निवळलेली दिसते. तिच्या मनातील किल्मिष निघून गेल्यासारखे येथे वाटते. " ययाती, देवयानी, शर्मिष्ठा या सर्वच 28 देवयानी : ' आपल्या सहवासात जे अनुपम सुख मी भोगलं, त्याची सर त्रिभुवनांतल्या दुसऱ्या कोणत्याही सुखाला येणार नाही. तें सुख ज्या या आपल्या शरीरानं मला दिलं ते शरीर जरी जरेनं ग्रासलेल असलं, तर .७९