पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इच्छा असावी असे देवयानीला वाटते. देवयानीला निरोप देतांना शुक्राचार्य भरल्या डोळयांनी म्हणाले होते, 'बाळे, तू जोपर्यंत माझ्याजवळ होतीस, तोपर्यंत तुझ्या आईचा वियोग जाणवला नाही मला कधी, ६ खाडिलकरांच्या 'विद्याहरणा 'तील देवयानी शुक्राचार्यांशी बोलतांना सतत ' आई जिवंत असती तर ' असे म्हणून आपल्या पोरकेपणाची जाणीव करून देते. माडखोलकरांच्या या नाटकातील शुक्राचार्यांनी देवयानीच्या मातेची भूमिका वठविण्या- ऐवजी तिच्या सहवासात त्यांचा आपल्या पत्नीच्या दुःखाचा भार हलका होतो. मात्र शुक्राचार्यांच्या या चित्रणात 'शाकुंतला' तील कण्वासारख्या तपस्व्याच्या मनांत असलेला सामान्य माणूस माडखोलकरांनी प्रभावीपणे टिपला आहे. म्हणूनच देवयानीला वाटते- 'बाबा, मी तुम्हाला एकटी टाकून आले - त्याचं प्रायश्चित असेल का हें? 17 अशी ही भावविव्हल देवयानी येथे चित्रित केली आहे. स्त्रियांच्या जीवनाच्या संदर्भातील चितन पौराणिक कथेच्या माध्यमातून सूचित केले आहे. ते लिहितात -- 'दुसन्या स्त्रीच्या प्रेमपाशात पति फसलेला पाहणे, यासारखं संकट नाही स्त्रीवर दुसरं, मरणचं ते खरोखरी. ' 'स्त्रीचं हे नाजुक दुःख, तिची कोमल पण दारुण व्यथा कधी कळणार नाही तुम्हाला बाबा' देवयानीच्या या उद्गारातून हेच सूचित होते. तिसन्या अंकात देवयानीचे रागीट आणि विजेसारखे प्रखर रूप पहायला मिळते. त्यामुळे या नाटकाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली आहे. स्वतंत्र चितन :- महाभारतातील ययाती उपाख्यानात शुक्राचार्य ययातीला शर्मि-

  • देवयानी : ग. त्र्यं. माडखोलकर, १९६४ (मं. २, प्र. ४, पृष्ठ ५७ ). ** देवयानी: ग. त्र्यं. माडखोलकर, १९६४ (अं. २, प्र. ४, पृष्ठ ५७) ७८-