पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देते. शमिष्ठेच्या मुलांमुळेच ययाती - शर्मिष्ठा यांचे गुप्त प्रेम उघडकीला आले आहे. शर्मिष्ठेची भूमिका येथे हीन पातळीवरून व्यक्त केली आहे. 'ययाती' येथे द्विधा मनःस्थितीत वावरतो म्हणूनच शर्मिष्ठेला तो 'माझ्या जीवनात तू यायला नको होते' असे निदान देवयानीच्या मनात विकल्प येऊ नये म्हणून म्हणतो. 24 आपला दासीधर्म पाळणारी शर्मिष्ठा आणि राजधर्म पाळणारा ययाती येथे चित्रित झाला आहे. जागृत स्त्री :- देवयानीतील स्त्री येथे जागृत आहे. कदाचित म्हणूनच तिची ययातीविषयीची पतित्वाची भावना संपते. एका सम्राटाला असे बिलासी जीवन जगण्याची संमती असावी हे विसरूनं ती बोलते. तिला शर्मिष्ठेने आपल्यावरच डावं उलटविला यांचे तीव्र दुःख येथे आहे देवयानी म्हणते, 'स्त्रीला तोपर्यंत पति आपला वाटतो, जो पर्यंत दुसरी स्त्री त्याच्यावर हक्क गाजवू शकत नाही. आता माझा पति ही राहिला नाही.' पुरूषांतला जो पशु असतो त्याला फक्त स्त्रीचं तारूण्य हवं असतें. 25 देवयानीचे हे उद्गार वसंत कानेटकरांच्या जागृत मत्स्यगंधेची आठवण करून देतात. शुक्राचार्यातील 'माणूस' -- माडखोलकरांनी या नाटकात 'व्यथित देवयानीची समजूत घालणारा शुक्राचार्यांचा आवाज अंतरिक्षातून होतो' या क्लृतीचा अवलंब अद्भुतरम्यतेला अवसर मिळण्यासाठी केला आहे. यातून शुक्रा- चार्यांच्या अंतःकरणाला हात घालणे त्यांना शक्य झाले आहे. एका प्रेमभंगातून दुसऱ्या प्रतारणेचा अनुभव घेऊ नकोस ही शुक्राचार्यांची 24 शर्मिष्ठा म्हणते 'दासीचा हक्क उष्ट्यावर म्हणून तू उष्टे केलेल्या महाराजांवर मी हक्क बजाविला, ' ययाती शर्मिष्ठेला उद्देशून म्हणतो, 'परमावधीचं सुख होतं आणि म्हणूनच वाटतं की, तू यायला नको होतंस माझ्या जीवनात. ' देवयानी : ग. त्र्यं. माडखोलकर, १९६४,

  1. देवयानी: ग. त्र्यं. माडखोलकर, १९६४,

अंक २, प्र. ३ पृष्ठ ४३ ) (अंक २, प्र. ४ पृष्ठ ५६ ) ७७