पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुलना केली आहे. यावर देवयानी म्हणते, 'त्यांच्या त्या दिव्य कवितेची सर मला कशी येईल? ' ! स्वतःच्या रूपाची स्तुती होत असूनही येथे देवयानी अहंकारी व रूपगर्विता नाही. देवगुरूचा पुत्र 'कच' याने आपल्याला फसविले असल्याचे ती ययातीला निःसंकोचपणे सांगते. आणि ययातीसुद्धा आपण पूर्वी कधी स्त्री स्पर्शाचे सुख अनुभवले नसल्याची ग्वाही देतो. हे सगळेच माडखोलकरांच्या कल्पनाविलासातून जन्मले आहे. स्वैर कल्पना :- या नाटकाच्या पहिल्या प्रवेशातच शुक्राचार्य येतात. 'वृषपर्वा ' 'शुक्राचार्य' यांना येथे महत्त्व असल्याचे दिसते. येथे शिष्यांवर उत्कट प्रेम करणारे व सौम्य मनोवृत्तीचे शुक्राचार्य चित्रित केले आहेत. ' विद्येचे उपासक विद्येसाठी जगतात ..... कुटुम्बासाठी नाही. त्यांची विद्या आणि त्यांचा संप्रदाय हेच त्यांचे कुटुम्ब होऊन बसते.' येथे वृषपर्वा 'ययाती - देवयानी' विवाहाला फारसा अनुकूल नाही. त्याला या नव्या नात्यांची भीती वाटते. या नाटकातील शर्मिष्ठा त्यानी व संप्रदायनिष्ठ वर्णिली आहे. तिच्या सौंदर्याची महती येथेही आहेच. 'हेमंतक' जेंव्हा शर्मिष्ठा रूपाने फार सुंदर आहे असे ययातीला सांगतो तेंव्हा हा ययाती अनपेक्षित प्रतिक्रिया व्यक्त करतो. तो म्हणतो, 'असेल, आपल्याला काय करायचेय तिच्या सौंदर्याशी ? ' * * • महाभारतातील रसिक व कामी ययातीच्या चित्रणाशी ययातीचे हे उद्गार विसंगत आहेत. हा ययाती सौम्य प्रवृत्तीचा आहे. अन्य स्त्रियांच्या शिकारीचा विचार तो करीत नाही. शर्मिष्ठा ही स्वतः होऊनच त्याला समर्पित झालेली स्त्री आहे. देवयानी 'कचा' ला हिणविण्यासाठी इंद्रपुरीला जाण्याचे पसंत करते. ययातीला देवयानी राजनीतीचे तर शर्मिष्ठा प्रेमशास्त्राचे घडे 28 देवयानीं : ग. त्र्यं. माडखोलकर, १९६४ ( अंक १ प्र. ३ प. २२) •७६ ...