पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बदलांना भरीव अर्थं प्राप्त होत नाही. उदाहरणार्थं महाभारतात पुरू हा शर्मिष्ठेचा कनिष्ठ पुत्र आहे. तेंव्हा तो माडखोलकर कल्पितात तसा ज्येष्ठ होऊ शकत नाही. बलराम आणि श्रीकृष्ण किंवा लव आणि कुश या भावांच्या क्रमात बदल करणे कोठेही उचित नाही. पण अशाही बदलांचा मोह त्यांना झाला आहे. महाभारतात शर्मिष्ठा देवयानीला कूपात ढकलून देते तर येथे अकारणच 'तलाव' कल्पिला आहे. या किरकोळ बदलातून काही विशेष परिणाम साधला जातो असेही आढळत नाही. प्रीती आणि भीती: नाटकाच्या प्रारंभी पडद्याआड पाण्यात बुडणारी देवयानी आप- ल्याला वाचविण्यासाठी पित्याला पाचारण करते हा नवा कल्पित पंग थरारक प्रसंग वर्णन केला आहे. या कल्पिताने नाट्य लेखनाच्या संदर्भात पेच निर्माण केला आहे. नाट्याविषयीची खरी ओढ माडखोलकरांना नाहीं हेच या आरंभातून दिसतें. माडखोलकरांनी या कथानकांत स्वच्छंद बदल केले आहेत. 'ययाती, पित्याच्या सूडासाठी ब्रह्मचारी राहतो, निदान तो पर्यंत लग्न न करण्याची त्याची प्रतिज्ञा आहे' हेमंतकाच्या बोलण्यातून हे सूचित होते. हा बंदलही एक बदलासाठी बदल म्हणून नव्याने केला आहे असे दिसते. 'प्रीतीला मुकलेली आणि जीवनाला विटलेली देवयानी मरणाच्या भीतीने वाचवा असे ओरडते. देवयानी ययातीने वाचविल्यावर मात्र 'पण कशाला वाचवलत मला?' असे म्हणते आणि शिवाय दुसन्या बाजूने अट्टाहासाने आपण पाणिग्रहण केल्याचे सांगते. यावरून माडखोलकरांची 'देवयानी' ही एकाच वेळी प्रीतीच्या आणि भीतीच्या गर्तेत सापडली आहे, हे स्पष्ट होते. तलावा- तून बाहेर काढलेल्या 'ओलेतीं' देवयानीच्या सौंदर्याचे वर्णन ययाती करतो. याठिकाणी ययातीने कवी शुक्राचार्यांच्या कवितेशी देवयानीची 22 शुक्राचार्यांच्या कवितेंतही सगळी रमणीयता आणि जयंती ( अप्सरा ) च्या सौंदर्यातील सगळी मनोज्ञता एकवटलेली आहे तुझ्या रूपात' अशी ही ययातीला जाणवलेली सुंदर देवयानी आहे. देवयानी : ग. त्र्यं. माडखोलकर, १९६४ ( अंक १, प्र. १, पृष्ठ ५)