पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

fear कोणतेही भक्कम तत्त्वज्ञान या निमितींच्या पाठीशी नाही. प्रस्तावनाकार श्री. विद्याधर गोखले यांनी 'वैरिण झाली सखी' नाट- काची भलावण केली आहे. २० स. त्र्यं. माडखोलकरांची 'देवयानी' :- कादंबरीकार माडखोलकरांनी १९६४ मध्ये 'देवयानी' नाटक लिहिले ही नवलाची गोष्ट म्हणावी लागेल. वयाच्या ६४ व्या वर्षी नाटक लिहिणारा हा 'कादंबरीकार' कोणत्या प्रेरणांनी प्रभावित झाला होता हे लक्षात घेण्याजोगे आहे. माडखोलकरांनी 'बलिन म्युनिच' येथे पाहिलेल्या 'ऑपेरा ' तून प्रेरणा घेतली असली तरी गद्यातच हे नाटक लिहिले आहे. पौराणिक कथावस्तूतील तपशीलात त्यांनी काही बदल केले आहेत.±1 नाटकात माडखोलकरांनी घेतलेली पुराणकथा वेगळी कोणती याचा उलगडा ते करीत नाहींत. बदल करण्याचे स्वातंत्र्य जरी लेखकाला असले तरी ते बदल कलादृष्ट्या सुसंगत असले पाहिजेत. माडखोलकरांनी या नाटकात केलेले बदल हे 'शिष्टसंमत' होणे अवघड आहे. येथे या ३० शिरवाडकरांचे 'ययाति आणि देवयानी' हे नाटक रंगत, परिणाम- कारिता नि दर्जा यासर्व दृष्टींनी प्रथम श्रेणीचे असले तरी, व्यासांच्या महाभारतीय कथेला, विशेषतः देवयानीला, अन्याय करणारे आहे. त्या मानाने खांडेकरांनी व्यासांवर कमी अन्याय केला आहे. म्हणूनच मुख्यत ॥ खांडेकरांच्या कादंबरीच्या सहाय्याने लिहिलेल्या या नाटकात 'ययाति आणि देवयानी' या नाटकात न आढळणाऱ्या काही वेगळया रंगछटा- मुख्यतः ययाति आणि शर्मिष्ठेच्या- आढळून येतात. ' वैरिण झाली सखी : संजीव शेंडे : १९७१, प्रस्तावना (पृष्ठ १४ ) 21 देवयानीची कथा निरनिराळया पुराणात निरनिराळया स्वरूपात आलेली आहे. त्या कथातील विसंगतीचा फायदा घेऊत नाट्यरचनेच्या सोयीसाठी भी कथानकात कांही फरक केले. त्यापैकी महत्त्वाचा फरक हा की, पुरू हा शर्मिष्ठेचा ज्येष्ठ पुत्र असल्याचे मी दाखविले आहे. त्याचप्रमाणेच शकुं तुलेची कथा देवयानीच्या कथेपूर्वी घडून गेली असल्याचे मी गृहीत धरले आहे. या शिवाय मी पौराणिक कथेत कोणताच फरक केलेला नाही. ' देवयानी : ग. व्यं. माडखोलकर, १९६४ निवेदन पृष्ठ ७