पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दोष आहे मी मोहाला बळी पडलो' असे तो मान्य करतो. देवयानीच्या संमतीशिवायच शुक्राचार्य शाप देतात आणि त्या शापाने येथे देवयानी हळहळते. नंतर शुक्राचार्य पुन्हा उःशाप देतात. 'वार्धक्य स्वीकारणारा तरुण तुझ्याच कुळातला आणि तुझ्याच रक्ताचा पाहिजे' हे ऐकून देव- यानी किंचाळून म्हणते 'हा तर मघाच्या शापाहूनही भयंकर आहे ' यावर एखाद्या वधूपित्याप्रमाणे शुक्राचार्य देवयानीला म्हणतात. 'लहान पणापासून तुझे लाड केले पण या वृद्ध पित्याच्या पदरात काय पडले ? अपमान.' पुरूची वार्धक्य स्वीकारण्यामागची भूमिका येथे वेगळी आहे. 'केंव्हातरी ही अवस्था प्राप्त होणारच मग वार्धक्य स्वीकारायला काय हरकत आहे ?' शर्मिष्ठाही आपले मागणे मागतांना आई आणि पत्नी या भूमिकेतून आपले दोन्ही डोळे मागते. कच येतो आणि पुरूचे वार्धक्य नाहीसे करतो. 'काम अर्थ पुरुषार्थच ठरती अनुसरता धर्माला । धर्मावाचुनि राक्षस बननी ग्रासतिसत्कर्माला.' हेच 'ययाति' कादंबरीचे सार येथे सांगण्याचा प्रयत्न आहे. या नाटकाचा शेवट गोड होतो. देवयानी म्हणते, 'शर्मिष्ठे, मी आता महाराणी नाही आणि तू दासीही नाहीस, आपण दोघी बालपणीच्या सख्या आहोत. '. एकूण, संजीव शेंडे यांनी 'ययाति' कादंबरीतही नाट्यरूपांतर करतांना काही फेरफार केले आहेत. हे यावरून दिसून येते. वि. वा. शिरवाडकर किंवा गिरीश कार्नाड ज्या प्रतिभेच्या सामर्थ्याने या कथा- 'नकाकडे पाहतात ते सामर्थ्य येथे प्रत्ययाला येत नाही. शुक्राचार्य, ययाती, देवयानी, शर्मिष्ठा यांच्या चित्रणात या काही वेगळ्या छटा येथे नाटककाराने रंगवल्या आहेत. पण कलात्मक नाट्यानुभवाच्या संदर्भात त्या विशेष परिणामकारक ठरल्या नाहीत. या उपाख्यानातील व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाला स्वतंत्र प्रतिभेचा स्पर्श या नाटकात फारसा झालेला नाही. शिरवाडकरांनी व्यक्तित्त्वाचा गाभा आपल्या 'ययाति आणि देवयानी' नाटकात शोधला आहे. तसे संजीव शेंडे यांचे व्यक्तिचित्रण नाही. 'ययाति' या आपल्याला आवडलेल्या कादंबरीचे नाट्यरूपांतर करणे एवढीच प्रेरणा येथे आहे. स्वतंत्र भूमिका ...७३