पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आहे. तर या नाटकातील 'देवयानी' दुष्ट, भयानक, मायावी व कपटी आणि ' शमिष्ठा' तितकी अधिक शांत, त्यागी सुस्वभावाची व सरळ मनाची शिरवाडकरांनी रंगविलेली आहे. महाभारतातील विचारांना आणि व्यक्तींनाही अनेक पदर, परिमाणे आहेत. त्यातील विशिष्टच स्वीकारण्याचा अट्टाहास करणे अवघड आहे. कलावंताच्या प्रत्ययाला येणारे त्याच्या जाणिवेचा भाग म्हणून जाणवणारे महाभारत त्याचे असते याच गोष्टीचा प्रत्यय शिरवाडकरांच्या या नाटकाने आणून दिला आहे. महाभारत स्वतःला अभिप्रेत असलेला आणि उलगडलेला अर्थ शोधण्याचा प्रयत्न कलावंत करतो. कलावंत पुराणकथा म्हणूनच या महाभारतातील उपाख्यानाचे चिंतन करतो. अशा प्रकारे साहित्यिकानेच त्यात नवा आशय भरून महाभारतात सतत वाढ केली आहे. 'ययाति' चे नाट्यरूपांतर :- संजीव शेंडे यांनी १९७१ मध्ये 'ययाति' कादंबरीचे 'वैरिण झाली सखी' या नावाने नाट्यरूपांतर केले आहे. 'ययाति' कादंबरीवर आधारित वि. वा. शिरवाडकरांचे 'ययाति आणि देवयानी' हे नाटक त्या अगोदर १९६६ साली प्रसिद्ध झालेले होते. पण ते नाटक आधारित नाटक आहे. नाट्यरूपांतर नाही. 'ययाति' कादंबरीचे हे नाट्यरूपांतर असल्यामुळे या ठिकाणीच त्याचा विचार केला आहे. 'ययाति' कादंबरी आणि 'ययाति आणि देवयानी' नाटक समोर ठेवून संजीव शेंडे यांनी हे नाट्यरूपांतर सादर केले त्यात अनुकरणाची आणि नवशिकेपणाची जाणीव होते. शर्मिष्ठा - देवयानीच्या कलहापासून पुरूच्या वार्धक्यग्रहणापर्यंतचा विस्तृत कथाभाग येथे घेतला असूनही नाटक आटोपशीर आहे. 'ययाति' कादंबरीप्रमाणेच येथेही एक ज्योतिषी शर्मिष्ठेचा मुलगा चक्रवर्ती होईल असे भाकीत करतो. कच, दासीपणातून शर्मिष्ठा मुक्त व्हावी अशी मागणी करतो. ययाती शुक्राचार्यांपुढे हतबल होतो. 'तो माझ्या यौवनाचा ७२