पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अभिप्राय ! महाभारताधिष्ठित अर्वाचीन मराठी ललित साहित्याचा अभ्यास या प्रबंधाचा आवाका तसा मोठा आहे. पण लेखकाने तो सावरला आहे. एका मोठ्या कालखंडातील शेकडो पुस्तकांचे वाचन व अभ्यास लेखकाने केला आहे; आणि तो चिकित्सक दृष्टीने केला आहे याचा प्रत्यय येथे आहे. प्रबंध लेखकाला मर्मग्राही दृष्टी आहे. समतोल टीका दृष्टीही आहे हेही जाणवते. ययाति, राधेय, युगान्त, व्यासपर्व, चक्र इत्यादी मोलाच्या वैचारिक आणि ललित कृत्तीचे योग्य रसग्रहण जसे लेखक करतो तसे त्याला सदोष लेखनाचेही भान आहे; मग ते मूळ कृतीचे असो की एखाद्या कृतीवरील समीक्षेचे असो. उदाहरणे म्हणून शिरवाड- करांच्या 'ययाती देवयानी ' वरील उषा हस्तक यांच्या परीक्षणाचा . चिकित्सक विचार जसा लेखक करतो. तसेच या नाटकात 'यती आणि विदूषक थोडा जास्त भाव खातात.' हे सांगायलाही विसरत नाही. माड- खोलकरांच्या 'देवयानी मधील स्वच्छंद, अनुचित बदलाची नोंद लेखकाने घेतली आहे. (टिपणीसांच्या 'मत्स्यगंधा' या नाटकातील गौरी या पात्राने काय साधले, ही चर्चा योग्य आहे आणि कलान्तर्गत न्यायात वसू शकेल असे पात्र चालेल ही चर्चाही समीक्षा ग्राह्य आहे. 'ठाकरे' यांच्या नाटकाच्या विवेचनात टीकात्मक विवेक आहे. 'भिडे' यांच्या द्रौपदी वस्त्रहरण नाटकाचे केलेले विवेचन सडेतोड आहे. टेंबे-खाडिलकर यांची तुलना उद्बोधक आहे. खाडिलकरांच्या कीचकवधाची स्तुती केल्यावर 'त्रिदंडी संन्यास ' वर केलेली टीका अशीच योग्य व समतोल आहे. ) संशोधनात्मक अभ्यास करतांनाही काही तत्त्वपध्दती (Research Methodology) असते, याची जाणीव लेखकाला आहे. (याचा प्रत्यय दोन ठिकाणी येतो. इरावती कर्वे यांचे अर्जुन विषयक प्रतिपादन 'युगान्त' मध्ये विखुरलेल्या अनेक संदर्भावरून सिद्ध केले आहे. हे एक स्थळ. दुसरे परिशिष्ट ज्यात महाभारताधिष्ठित अर्वाचीन मराठी साहित्याची कालानुक्रमे मांडणी केली आहे. ) लेखकाच्या समतोल स्वतंत्र समीक्षादृष्टीमुळे या प्रबंधाने एका विशिष्ट विषयावरील मराठी साहित्याचे संकलन व अभ्यास सिद्ध झाला आहे. त्याचे मोल आहेच. डॉ. गो. के. भट (पुणे)