पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- हे चित्रण या दिशेने शेवटपर्यंत होत नाही. १ कचाच्या व्यक्तिमत्त्वातील उदात्ततेचे रूप साकार व्हावयाचे असल्यामुळे ही गर्विष्ठ देवयानी नाट- काच्या शेवटी असहाय्य होते. या नाटकाचे हे विशेष लक्षणीय वैशिष्ट्य आहे. पौराणिक कथानकात अबोल प्रदेश (Area of Silence) विपुल असतो. त्यावर कलावंताने आपले लक्ष केंद्रित केले म्हणजे पुराणकथेतून त्याला काही नवे आकलन होते, नवा प्राण त्या कथेत भरता येतो. येथे कचाचे सात्त्विकीकरण शिरवाडकरांनी याच एका प्रेरणेतून केले आहे. महाभारताच्या तुलनेत 'ययाति आणि देवयानी' नाटकाचा विचार करीत असताना प्रा. राम मंत्री यांनी शर्मिष्ठेला चांगले व देवयानीला दोषास्पद रंगविले असल्याचे म्हटले आहे. महाभारताशी केलेल्या तुलने- तून हा विचार संभवतो. पण जर कलाकृतीचे स्वतंत्र वास्तव गृहींत धरले आणि त्या संदर्भात नाटकाचा, त्यातील घटकांचा विचार केला तर मग मुद्दाम दोन व्यक्तींच्या चित्रणात लेखाकाने दुजाभाव केला असे जाणवणार नाही ज्या विशिष्ट गृहीतावर नाटकाची उभारणी होते त्या नाटयातील अंतर्गत कलात्मक संगतीचा शोध या चित्रणातून लागतो. त्यासाठी लेखकाने निर्माण केलेले कलात्म अनुभवातील वास्तव गृहीत धरावे लागते. येथे देवयानी आणि शर्मिष्ठा या व्यक्तिचित्रांविषयी तफावत निर्माण होते. मुळातील देवयानी साधी भोळी, पित्याची लाडकी कन्या आणि शुक्राचार्यांकडे तक्रार नेऊन न्याय मिळविणारी आहे, निष्कपटी 19 कच : तू म्हणालीस, ययाति एकटा आहे पण तो एकटा नाही हे तू आता बघितलं आहेस. दुःख एकाकी नसतं देवयानी, एकाकी असतो तो अहंकार, माणुसकीचा साक्षात्कार झालेली शर्मिष्ठा - विदुषकासारखी माणसं दुःखाच्या भोवती कड करुन उभी राहतात. तुझ्या सारखी माणसं मात्र अहंकाराच्या आणि क्रोधाच्या काळ्याशार पहाडावर, पंख जळालेल्या गरुडासारखी तडफडत असतात- अगदी एकटी, सांग, आपण एकटे निराधार आहोत असं तुला वाटत नाही ? देवयानी ( आवेगाने दोन्ही हातांनी तोंड झाकून घेत ) हो, हो, वाटतं आहे! (अंक ३ पष्ठ ५३) ७१