पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जाणवते. कच, देवयानी, ययाती, शर्मिष्ठा यांच्या प्रेमाचे विविध रंग ते येथे समरसून अभिव्यक्त करतात. देवयानीचे कचावरील आणि शर्मिष्ठेचे ययातीवरील प्रेम त्यांना विशेष उत्कटत्वाने जाणवले. कचाच्या अंत:- करणात शुद्ध प्रेमभाव भरलेला आहे तर प्रेमानुभवातील निराशा पदरी पडल्याने शरीरभोगाच्या तत्त्वज्ञानाला ययाती सामोरा जात आहे. दास्य नशिबी आलेली, पण ययातीवर उत्कट प्रेम करणारी शर्मिष्ठा आपल्यापरीने ययातीला सावरण्याचा प्रयत्न करते, राजा ययाती आपल्यावर मना- पासून प्रेम करणाऱ्या शर्मिष्ठेच्या सहवासात स्वतःला रमवितो. या नाटकातील सर्वच प्रमुख व्यक्ती परस्परांशी प्रणयाच्या नाट्याने बांध- लेल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीचे प्रेम हे एक स्वतंत्र प्रणयानुभूतीचे वर्तुळ आहे आणि या वर्तुळांनी परस्परांवर लक्षणीय प्रकाशझोत टाकला आहे. देवयानी : शोकनाट्याची नायिका :- देवयानी शोकनाट्याची नायिका म्हणून आपल्या नजरेत 'ययाती आणि देवयानी' या नाटकात भरते. 'कच' या नाटकात आपल्याला अवगत झालेल्या संजीवनी विद्येचा एका वेगळ्या अर्थाने वापर करतो, तो ययातीपेक्षा देवयानीला तिच्या अधःपातापासून वाचविण्यासाठी ! शिरवाडकरांनी दिलेले हे नवे वळण त्यांच्या अनुभूतीशी इनाम राखणारे आहे. या नाटकात यती आणि विदूषक थोडा जास्त भाव खातात. त्यांना वाजवीपेक्षा अधिक स्थान येथे मिळाले आहे. शर्मिष्ठेपेक्षा ही कचाचे अतिभव्य आणि उदात्त दर्शन या नाटकात घडते. कच व देवयानी यांचे अपूर्व कोटीतील प्रेम येथे चित्रित केले आहे. शिरवाडकरांचे त्यांच्या सर्वच नाट्य काव्य आदी साहित्यातून आढळणारे ध्येयवादी उदात्त मन महाभारतातील कथानकावरही आपला ठसा उमटविते. ययातीचे दुःख शतपटीने वाढविण्याची प्रतिज्ञा करणारी देवयानी मोठी अहंकारी आहे पण एकाकीपणाची वा एकटेपणाची जोड देऊन एक शोकनाट्याची नायिका म्हणून तिचे आरंभी होणारे ७०...