पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यक्तिरेखा त्यांच्या त्यांच्या अर्थाची आणि प्रवृत्तींची प्रतीके बनतात. : त्यामुळेही असेल, पण त्या आपापली व्यक्तित्ये हरवतात आणि लेखकाने आखून दिलेल्या अर्थाच्या आसाभोवतीच फिरतात - वाढतात, शिरवाड- करांच्या 'ययाति आणि देवयानी' नाटकातील व्यक्तिरेखा ह्या केवळ प्रतीक न होता त्यांना स्वत:चे एक जिवंत व्यक्तिमत्त्व लाभते. म्हणूनच देवयानी शाप देते. ही घटना महाभारताला ( व ययाती कादंबरीला ) सोडून असली तरी तिच्या साकार झालेल्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून ती अस्वा- भाविक व अनाठायी वाटत नाही. महाभारतातील उपाख्यानाला एक नवा धुमारा येथे फुटलेला दिसतो आणि असे नवे नवे धुमारे फुटून मराठी प्रतिभावंतांनी महाभारत सतत पल्लवित, सुविकसित केल्याचे आढळते. शर्मिष्ठेविषयी वि. वा शिरवाडकरांना नको तेवढी अनुकंपा वाटते म्हणून हे नाटक मूळ कथेचा आधार सोडून लिहिले असल्याचा आक्षेप उषा हस्तकांनी घेतला आहे. 1 18 शर्मिष्ठेविषयी वाटणारी ही अनुकंपा मुळात ययाती कादंबरीत खांडेकरांनी व्यक्त केली आहे. त्याचा आधार या नाटकाला बराचसा आहे. त्या अनुरोधानेच या नाटकातील अन्य व्यक्तिरेखा चित्रित केल्या आहेत. उषा हस्तक या नाटकाच्या परीक्षणलेखात आपले लक्ष शुक्राचार्यांवर केंद्रित करतात. त्या लिहितात, 'शुक्राचार्यांच्या रूपाने उभे असलेले महान दुःख हेच खरे कलावंताचे आव्हान आहे.' पण त्यांची ही जाणीव स्वतंत्र व्यक्तिनिष्ठ व वेगळी आहे. या जाणिवेतूनही पूर्वी ' विद्याहरण' लिहिले गेले आहेच! एकाच उपाख्यानातून अशा नव्या जाणिवा प्रकट होणे शक्य आहे. पण त्यामुळे शिरवाडकरांच्या जाणिवेला या चिंतनाला धक्का लागत नाही. खांडे- करांच्या काय किंवा शिरवाडकरांच्या काय व्यक्तींचें स्वभाव व प्रकृती यांची एक खास मांडणी आहे, विकास आहे. या व्यक्तिरेखा म्हणजे जीवनमुल्याच्या आणि कलामूल्यांच्या चिंतनाचा परिपाकच होय. प्रणयानुभूतीची विविध चित्रणे :- शिरवाडकरांना विशेषेकरून या व्यक्तींच्या साहचर्यात प्रेमभावना 18 ययाति आणि देवयानी उबा हस्तक (लेख) प्रतिष्ठान जून, ७० ६९