पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवयानीचा शाप :- पौराणिक सत्य बाजूला ठेवून नाट्यनिर्मितीच्या दृष्टीने शिर- वाडकर देवयानीजवळ शाप देण्याचे सामर्थ्य आहे असे चित्रित करतात. एकूण नाटकाच्या संदर्भात केवळ शाप देण्यासाठी शेवटी शुक्राचार्यांचे रंगभूमीवर आगमन दाखविणे त्यांना इष्ट वाटेना, त्यांच्या मनात देवयानी एका वेगळ्या तऱ्हेने प्रतिबिंबित झाली. त्यातून हा प्रसंग उद्भवला. देवयानी ही एका उग्र तपस्व्याच्या तालमीत वाढलेली मुलगी म्हणून शाप देण्याइतकी ती सामर्थ्यवान बनते. कल्पनाजनित कलाकृतीत या गोष्टींनाही स्थान द्यावे लागते. शरीरभोगाच्या तत्त्वज्ञानाला सामोरा जाणारा 'ययाती', अहंकारी मत्सरी 'देवयानी', निरागस प्रणयिनी 'शर्मिष्ठा', उदात्त मूल्य जोपासणारा 'कच', अतिरेकाने बेताल झालेला 'यती' या सगळ्यां व्यक्तिरेखा 'ययाति' कादंबरीतील स्वभावधर्म घेऊनच येथे अवतरल्या आहेत. पण शिरवाडकरांच्या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात 'कच - देवयानी' आणि 'ययाती - शर्मिष्ठा' यांच्या उत्कट प्रणयानुभूतीचे रंगतदार चित्रण अप्रतिम केले आहे. 'ययाती आणि देवयानी' या एका काव्यात्म अनुभवाच्या लयीत, हा शिरवाडकरांनी कल्पिलेला देवयानीचा हा शाप प्रसंग निश्चितच बसतो. ललित साहित्य- निर्मितीची प्रक्रिया ही एक गूढ प्रक्रिया आहे. कलावंत जाणीवपूर्वक (Consciously } काहीही नवे निर्माण करू शकत नाही. त्याच्या सुप्त मनाने जे स्वीकारले. तेच येथे व्यक्त होते. या भूमिकेतून 'ययाति आणि देवयानी' नाटकाचा शेवट शिरवाडकरांनी स्वतंत्र कल्पिला आहे. नाट्यानुभवात ( Dramatic Experience) हा शेवट अपरिहार्य वाटतो.. महाभारतातील कथेत काही मूलगामी बदल नाटककाराने केले त्यातून मानवीमनाचे एक सुसंगत चित्र त्यांना रेखाटता आले. भव्यतेबद्दलचे वेड, क्षुद्रतेचा तिरस्कार आणि अन्यायाबद्दल जळ- जळीत संताप हे कुसुमाग्रजांच्या कवितेचे विशेष त्यांच्या नाटकातून, 'ययाति देवयानी' तूनही व्यक्त होतात. म्हणूनच त्यांच्या नाटकातील व्यक्तिरेखा एका आगळया, भव्य अशा त्यांच्या मनाच्या मुशीत जन्मतात आणि प्रतिभाबलाने चैतन्यपूर्ण होतात. त्यामुळेच कळत-नकळत ह्य ६८ ..