पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शर्मिष्ठेविषयीची अनुकंपा आणि कचाचे व्यापक व्यक्तिमत्त्व यां जाणिवांनी आशयाला उदात्त आणि जिवंत स्वरूप येथे प्राप्त होते. मद्यप्राशनाच्या निमित्ताने विवाहाच्या पहिल्याच 'सुहागराती ' 'ययाती' आणि 'देवयानी' यांच्यात मीलनाऐवजी खटका उडतो. तें परस्परांपासून केवळ शरीरानेच नव्हे, तर मनानेही दूर जातात. देव- यानीचा अहंकार, सदाचाराचा कैफ, सत्ताधीशाची वृत्ती, ययातीचा आपल्यावर रोष ओढवून घेण्यास कारणीभूत होते. या अनपेक्षित अपेक्षाभंगाने ययाती विमनस्क, केविलवाण्या, एकाकी अवस्थेत सापडतो. अशावेळी आपल्या नाजुक प्रणयभावांनी, लावण्याच्या मोहजालांनी, समर्पणशील एकनिष्ठ वृत्तीने ' शर्मिष्ठा' ययातीला आकर्षित करते. ययातीचे शर्मिष्ठेकडे आकर्षित होणेही येथे स्वाभाविक वाटते. ' कच' आणि 'यती' या दोन व्यक्तिरेखांच्या साहचर्यात 'ययाती' आणि 'देवयानी' या व्यक्तिरेखांच्या जीवनातील अधिकउणाभाव उल- गंडतो. या व्यक्तिरेखा एकाचवेळी परस्परांशी सम-समांतर चित्रित केल्या आहेत. देवयानी आणि कच यांच्या दिव्य प्रेमाची साक्ष येथे नव्याने पटते. ययाती आपल्या कह्यातून निसटलेला पाहून असमर्थ आणि अगतिक बनलेली देवयानीच ययातीला वार्धक्याचा शाप देते. ही शिरवाडकरांच्या कल्पनेतील प्रसंग योजना असली तरी नाट्यात्म वास्तवाशी सुसंगतच आहे. तपस्वी कविराज शुक्राचार्यांची ती तेवढीच प्रखर तेजस्वी कन्या आहे म्हणून तिच्या अंगी शाप देण्याचे सामर्थ्य असणे शिरवाडकरांना संभवनीय वाटले आहे. ते पटते. देवयानी शाप देते या प्रसंगातून शिर- वाडकरांना माणसाच्या मनाचा शोध अभिप्रेत आहे, असे वाटते. त्यांच्या या नव्या योजनेमुळे कचाच्या उत्कट आणि उदात्त प्रेमाला नव्याने अवसंर मिळाला असून कचदेवयानी या अभंग समासाची प्रचीती येते. मूळ महा- भारतात अशोक वनात ययाती आणि शर्मिष्ठा यांचा गांधर्व विवाह होतो. देवयानी आपल्या पित्याकडून शुक्राचार्यांकडून - राजा ययातीला वृद्धत्वाचा शाप देवविते. या घटना नाटकाच्या तिसन्या अंकात शिर- वाडकरांनी बदलून टाकल्या आहेत. ६६ .