पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिला असला तरी त्यात शिरवाडकरांच्या प्रतिभेचे विशेष जाणवल्या- शिवाय राहत नाहीत. ' या नाटकासाठी महाभारतातील मूळ कथानकात काही महत्त्वाचे फेरबदल केले आहेत. नाटकासाठी जे कार्यकारी सूत्र मी गृहीत धरले त्याच्या परिपोषासाठी हे बदल मला आवश्यक वाटते. पौराणिक कथा या बहुतांशी काल्पनिक कथा असतात साहित्यिकाने त्यातील आपल्याला उत्कटतेने जाणवते, तेच सूत्र घेऊन त्याच्याशी सुसंगत असा नवा तपशील त्याच्याभोवती उभारावा अथवा मुळात असलेला परंतु विसंगत असा तपशील गाळावा, बदलावा यात काहीही वावगं नाही आणि नवीनही नाही. ' ' 'ययाति आणि देवयानी' या नाटकाच्या प्रस्तावनेत शिरवाड- करांनी मांडलेल्या या भूमिकेवरून त्यांचा महाभारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. 'ययाति' कादंबरीने त्यांना नाट्यलेखनास स्फूर्ती आणि पुष्कळसा आधार दिलेला आहे' हे त्यांनी प्रांजलपणे मान्य केले असले तरी 'ययाति आणि देवयानी ' नाटकात वि. वा. शिरवाड- करांच्या स्वतंत्र प्रतिभाशक्तीचा प्रत्यय येतो. प्रत्येक साहित्यकृतीचे एक स्वतंत्र खास स्वतःचे असे वास्तव असते आणि हे वास्तव निर्माण करण्यात प्रस्तुत नाटककाराला यश लाभले आहे. काळोखात प्रकाशरेखा :- शिरवाडकरांना काळोखात एखादीतरी प्रकाशरेखा आढळतेच आणि ती शोधण्याचा त्यांचा प्रयत्न असतोच. ययाती उपाख्यानाशी समरस झालेल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वि. स. खांडेकरांप्रमाणेच कचाच्या व्यक्तिरेखेतही प्रकाशरेखा सापडलो. मग त्यांच्या सर्व चिंतनाचा प्रवास या प्रकाशरेखेच्याच दिशेने झाला त्यांना कचाच्या व्यक्तित्त्वाचे आकर्षण आहे आणि म्हणून शिरवाडकर कचाचे उदात्तीकरण करतात. 'ययाति आणि देवयानी' नाटकात वि. वा शिरवाडकरांच्या मूलतः काव्यात्म आणि चिंतनशील व्यक्तिमत्त्वाचे विशेष आढळतात. चिंतन- शील अंतर्मुख मनोवृत्ती व उत्कटं, भव्यत्वाचे- दिव्यत्वाचे जबरदस्त आकर्षण असलेली त्यांची प्रतिभाशक्तीही येथे प्रत्ययाला येते. .६५