पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नवा आविष्कार :- काळाच्या परिवर्तनाबरोबर मानवाचे चित्रही बदलते आणि बन्याच अंशी स्थिर असते. आज पुराणकाळ बदलला असून त्या काळा- तील व्यक्ती जशाच्या तशा आढळत नाहीत. महाभारत हे मानवी जीवनाचे व संस्कृतीचे संचित आहे. हे जीवनावरील प्रचंड भाष्य आहे. या संस्कृति - संचिताला एक सतत वाढ आहे म्हणूनच आजच्या काळा- तील नव्या माणसाचा साक्षात्कार या महाभारताच्या एक उपाख्यानातील व्यक्तीतही घडू शकतो. 'ययाति' कादंबरी हे यांचे उत्तम उदाहरण आहे. - मानवी जीवनाच्या चिरंतन मूल्यांचा आविष्कार महाभारतात आहे. त्या मूल्यांचा शोध घेत घेत नव्या अनुभूतीतून नवी साहित्यकृती • जन्माला येते. खांडेकरांनी 'ययाति' त हाच मार्ग स्वीकारला आहे. कामयज्ञ आरंभून अधिक प्रज्वलित होणारा 'ययाती' आणि स्त्रीसुखाची इच्छाच नसलेला 'यती' यांचे चित्र विरोधाने अधिक खुलले आहे. 'कचा' ला खांडेकरांनी स्वतःच्या कल्पनेप्रमाणे रूप दिले आणि कादं- बरीत महत्त्वाचे स्थान प्राप्त करून दिले आहे. भवितव्याचे चित्र कचाच्या स्वरूपात ते पाहतात. कलानिर्मितीचा व्यवहार ही एक सांस्कृतिक गरज आहे. रंजन, उद्बोधन, कलात्मकता यासाठी पुराणकथा सतत योजिल्या जातील हे 'ययाति' सारख्या साहित्यकृतीनेच स्पष्ट झाले आहे. तथापि कलाकृतीचा ज्ञात हेतू कोणताही असला तरी ती कक्षा ओलांडून साहित्यकृतीने कलात्मक असायला हवे. 'ययाति' कादंबरीने ज्ञात हेतूंना पार करून त्या पलिकडील नवा कलात्मक आविष्कार महाभारतातील ययाती उपाख्यानाच्या आधारे केला आहे वि. वा. शिरवाडकरांचे 'ययाति आणि देवयानी' :- कलानिर्मिती ही एक अंतःस्फूर्त आणि गूढ प्रेरणा आहे हे लक्षात . घेतले म्हणजे महाभारतातील ययाती उपाख्यानावर आधारित वि. स. खांडेकर आणि वि. वा. शिरवाडकर यांनी केलेल्या नवनिर्मितीची कल्पना येते. वि. वा. शिरवाडकरांनी आपले नाटक खाडेकरांच्या 'ययाति' कादंबरीवर आधारित आहे असा निर्वाळा स्वतः प्रस्तावनेत ६४