पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यक्तिरेखांना खांडेकरांनी पुरेपूर स्वातंत्र्य घेऊन रेखाटले आहे. अन्य पात्रांच्या चित्रणातही त्यांनी मुक्त स्वातंत्र्य घेतलेले दिसून येते. 'संजीवनी विद्येचे हरण करून देवलोकी गेलेल्या महाभारतांतील 'कच ' पुन्हा आपल्याला कधीच भेटत नाही! पण या कादंबरीत ' मी त्याचे उत्तर चरित्र अर्थात काल्पनिक चित्रित केले आहे.' असे खांडेकरांनी स्वतःच पार्श्वभूमीत नमूद केले आहे. हा कच प्रेमाच्या एका श्रेष्ठ रूपाचा प्रतिनिधी म्हणून येथे चित्रित केला आहे. कादंबरीत देवयानी आणि शर्मिष्ठा या दोन नायिका आहेत. म्हणून नायकही दोन असावेत, या समजुतीतून कचाचे उत्कट चित्रण येते. खांडेकरांनी 'कच ' ध्येयवादी, विचारी, संयमी तरूण म्हणून साकार केला असला तरी त्याच्या मनात देवयानीविषयी निरपेक्ष प्रेम असल्याचे चित्रित केले आहे. हे उदात्त प्रेम येथे कंचाचा स्वभावधर्म झाले आहे. 'विद्याहरणा' मध्ये नाट्याचार्य खाडिलकर अशाच उदात्त व निरागस प्रेमाचे चित्रण कचदेवयानीच्या प्रणय प्रसंगातून करतात. विद्याहणाच्या पहिल्या अंकातील अखेरचा प्रवेश आणि दुसऱ्या अंकातील मध्यभाग या प्रणय रंगांनी रंगलेला आहे. खांडेकरांच्या ययातीतील कचाने आपल्या विफल स्त्री प्रेमाचे विशाल मानव प्रेमात रूपांतर केले आहे. एक विकसित आत्मा म्हणून खांडेकरांचा कच अवतरला आहे. तो आत्मविकासाची धडपड करणाऱ्या 'मानवाचा प्रतिनिधी आहे, तर ययाती अष्टौप्रहर सुखभोगण्याच्या निराधार नादात आरमलोपाला प्रवृत्त असलेल्या मानवाचा प्रतिनिधी आहे. महाभारतातील ययाती बिचारा, पापभीरू आहे. त्याला शर्मिष्ठेची शय्यासोबत करताना शुक्राचार्यांच्या सूचनेची आठवण होते. शर्मिष्ठेच्या युक्तिवादाला तो सामोरा जातो. पण खांडेकरांची 'ययाती' च्या रूपा- तील अनुभूतीचं नवी आहे. 'आधुनिक मानवाचे मन हा एक अतृप्त, हिस्त्र प्राण्यांनी भरलेला अजबखाना बनत चालला आहे.' म्हणूनच त्यांचा ययाती, महाभारतातील ययातीपेक्षा भिन्न स्वरूपात आविष्कृत झाला आहे. या व्यक्तींची मनोभूमिका जाणून घेऊन खांडेकरांनी त्यांना नवे अर्थ दिले आहेत. ६३