पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकाच भावनेचे परिणत होत जाणारे रूप येथे आढळते. ययातीच्या रूपात आसक्तीकडून विरक्तीकडे जाणारा दीपस्तंभ त्यांनी उभा केला आहे. साठी या मूल्यांची प्रतिष्ठापना होणे अगत्याचे आहे, असे खांडेकरांनी सूचित केले आहे. खांडेकरांचे हे चिंतन समकालीन, वर्त- मानकालीन तर आहेच, पण त्याबरोबरच कालातीतही आहे. मानवी प्रवृत्तीवर ययाती उपाख्यानातून शोधलेल्या सूत्राच्या आधाराने खांडेकरांनी येथे प्रकाश टाकला आहे. कथा, काव्य, मनोविश्लेषण आणि तत्त्वज्ञान यांच्या मनोज्ञ hear अपूर्वं साक्षात्कार या पुराणकथेतून खांडेकरांनी घडविला आहे. पुराणकथेचे एका प्रतिभावंत मनाने केलेले हे सर्जन पाहिले म्हणजे महाभारताचे मराठी ललित साहित्यिकांनी केलेल्या नव्या आविष्काराचे मोल लक्षात येते. ययाती उपाख्यानातील एकेका व्यक्तीत खांडेकरांनी नवा प्राण भरून त्या नव्या काळांच्या संदर्भात पुन्हा जिवंत केल्या आहेत स्त्रीत्वाचा एक समर्थ आविष्कार देवयानीच्या रूपात येथे प्रगट आहे. स्वतःसाठी आत्मकेंद्रित वृत्तीने जगण्यापेक्षा दुसन्यासाठी जग- ण्यांतच खरा आनंद आहे. 'प्रपंच हा यज्ञ आहे. प्रीती, वात्सल्य, कारुण्य हे तुमचे ऋत्विज आहेत. निरपेक्ष प्रेमाचे बोल हे तुमचे मंत्र आहेत सेवा, त्याग, भक्ती या. तुमच्या संसारयज्ञातल्या आहुती आहेत. ' प्रापंचिकांना ययाती-देवयानीच्या कथेच्या निमित्ताने कचाच्या मुखाने खांडेकरांनी हा संदेश दिला आहे. कार्लमार्क्स, फ्राइड, महात्मा गांधी या विचारवंताच्या विचारांच्या संस्काराने संस्कारित झालेले खांडेकरांचे संपन्न व्यक्तिमत्त्व आहे. म्हणूनच 'ययाति' कादंबरीत चिरंतन तत्त्वज्ञानाचा वेध घेणारे, ययाती उपा- ख्यानाचे चिंतन कलात्मकतेच्या पातळीवरून अभिव्यक्त झाले आहे. महाभारतावर आधारित साहित्यकृतींमध्ये नव्या समर्थ आविष्काराचे मानाचे स्थान 'ययाति' कादंबरीला यासाठी द्यावे लागते. व्यक्तिचित्रणातील स्वातंत्र्य :- ६२ .. 'ययाति' कादंबरीत ययाती, देवयानी, शर्मिष्ठा या महत्त्वाच्या