पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

, निरपेक्ष प्रेम ही आत्म्याच्या विकासाची पहिली पायरी आहे याच दिशेने जीवनाची वाटचाल करायला पाहिजे. 'त्याच्या जागी आपण 'आहोत' अशी क्षणभर कल्पना केली तर दुसऱ्याच्या सुखदुःखाशी समरस होता येते. विचारांच्या साहाय्याने विकारावर विजय मिळवावा. काम आणि अर्थ हे महान प्रेरक पुरुषार्थ आहेत पण धर्माच्या हाती लगाम असावा. त्यासाठी एक रूपक या कादंबरीत अतिशय प्रभावीपणे योजिले आहे. उपनिषदात हे मूळात आलेले आहे. आत्मा रथी, शरीर रथ, बुद्धी सारथी, मन लगाम, रथाचें घोडे इंद्रिय' आणि वाटा 'उपभोगाच्या ' अशी ही कल्पना आहे. 'इंद्रिय रूपी घोड्यांना मनाचा लगाम असला पाहिजे तो लगाम बुद्धिरूपी सारथ्याच्या हाती असावा. बुद्धी आणि मन यांनी मिळून संयमाने हा शरीररूपी रथ चालवावा लागतो. अन्यथा भोगाच्या धुंदीत हा लगाम निसटून इंद्रियरूपी घोडे, उपभोगाच्या वाटेवर उन्मादाने उधळून रथाचा, रथ्याचा आणि सारथ्याचा बरोबरच चक्काचूर होतो. रक्ताची वाघाला जशी चटक असते तशी काम भावनेची चटक माणसाला लागते. जस जशा जास्त आहुती पडत जातात तसतसा कामाग्नी भडकतच जातो.. बि. स. खांडेकरांना या कादंबरीतून 'मंदार'च्या फुलपाखरा- सारख्या क्षणभंगुर, चालू क्षणाच्या अधःपाताच्या तत्त्वज्ञानापेक्षा कचाचे गरुडाचे अमृतकुंभ मिळविणारे तत्त्वज्ञान येथे पटवून द्यावयाचे आहे. 'खांडेकरांची 'ययाति' कादंबरी 'एकाच वेळी भावनात्मक आवाहन करते मानवीजीवनाचे दर्शन घडविते, समाजाला सुयोग्य शिकवण देते. आणि कलात्मक रंजनही करू शकते. ' हे सामर्थ्य या महाभारतातील उपाख्यानाच्या स्वतंत्र चितनातून निर्माण झाले आहे. त्यातील व्यक्ती जिवंत आणि प्रतीक बनून अवतरलेल्या आहेत. ययातीची भोगकथा, शर्मिष्ठेची प्रेमकथा, देवयानीची संसारकथा आणि कचाची त्यागकथा या कादंबरीत साकार झाली आहे. खांडेकरांना कामवासना, कामभावना, प्रीतिभावना आणि भक्तिभावना असे हे ६.१