पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाशात भावशून्य का बनते ? " हे ययातीचे दुःख आहे. समर्थ अर्थवान प्रतिमांच्या योजनेतून 'ययाति'त खांडेकरांच्या प्रतिभेचा आविष्कार झाला आहे. · समाजचतन व जीवनदर्शन :- खांडेकर हे समाजाचे लेखक आहेत. त्यांच्यातील शिरोड्याचा शिक्षक सदैव जागृत असतो. आणि तोच त्यांच्या साहित्याला समाज चितनाच्या आविष्कारांची प्रेरणा देतो. 'ययाति' कादंबरीच्या निर्मिती प्रेरणेत व त्यांच्या प्रबोधन कार्याची आणि मानवी जीवनदर्शनाच्या तळमळीची कल्पना येते. पायाखालची वाट दिसत नाही तेव्हा शुक्राच्या चांदणीची सोबत महत्त्वाची मानणारे खांडेकर आहेत. समाजात 'कच थोडे, ययाती फार' ही स्थिती जेंव्हा त्यांच्या लक्षात येते तेंव्हा ते कचाच्या निमित्ताने संयमाचे आणि ययातीच्या निमित्ताने मानवी भोगवादी प्रवृत्तीचे चित्रण करतात. या प्रतीकातून त्यांना 'शरीर भोगासाठी आहे पण जागृत आत्म्याचे बंधन त्याला असले पाहिजे' असे सांगावयाचे आहे. या जगात गोड फळांनाच कीड लागण्याचा संभव अधिक असतो म्हणून ते सावधानतेची सूचना देतात. धर्माचे उल्लंघन न करणान्या मर्यादित भोगात पाप नाही. सगळेच जोवनात सुसंयत असावे हे मामिक जीवनविषयक तत्त्वज्ञान येथे खांडेकर व्यक्त करतात. ययातीचे चित्रण प्रत्यक्ष जीवनातील अनुभूतीशी संलग्न आहे तर कच त्यांच्या ध्येयवादी स्वप्नाशी निगडित आहे. एकीकडे फुलांना हुगत सुटणारा 'ययाती' तर दुसरीकडे कोमेजणाऱ्या फुलांना पुन्हा उमलविणारा उदात्त 'कच' आहे. त्यांना मानवी जीवनातील वासना हो एखाद्या महापुरासारखी आणि भावना शरदऋतूतील संथ नदीसारखी भासते. देव आणि नियतीपेक्षाही माणसाचा शत्रू माणूसच असतो, त्या माणसातील पशू असतो. या गोष्टीवरील खांडेकरांचा विश्वास येथे • व्यक्त होतो. नियतीचे सर्वत्र स्तोम माजवून माणसाची प्रत्येक गोष्टीतील असहायता व्यक्त करणायांना त्यांनी या कादंबरीत स्वोख उत्तर दिले आहे. ६० -4