पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावविश्व लक्षात घेता असे होणे अपरिहार्य होते असे वाटते.' 'ययाति' कादंबरीतील कचाला त्याग प्रिय आहे. तर ययातीला लहानपणापासून फुलांचा हव्यास आहे. पुढे हाच ययाती रतीच्या रमणीय मूर्तीची लाख चुंबने घेणारा ययाती होतो. आपल्या वडिलांच्या मृत्यूचे दुःख विसरण्यासाठी तो मुकुलिनाला जवळ घेतो. 'कोण कुणाच्या मिठीत हे मदनालाही सांगता येणार नाही.' असे त्यांच्या घट्ट मीलनाचे वर्णन खांडेकर करतात. युवतीच्या मधुर उन्मादक सहवासाने आलेली ती मधुर मूर्च्छा असते. खांडेकरांनी या कादंबरीत 'माधव' च्या भावाचे काव्य वाचण्याच्या निमित्ताने मनसोक्त कल्पनांची सुंदर वलये निर्माण केली आहेत. 'गालावरची लाली लज्जेतून उद्भवत नाही, तर विर- हिणीच्या, जाग्रणाने लाल झालेल्या डोळघातील लाली प्रियदर्शनाने आलेल्या आनंदाश्रुतून गालावर ओघाळते अशी ही मनोरम शृंगारिक कल्पना आहे. येथे 'रजनीस्तोत्र' ही असेच आलेले आहे. देवयानीला विहिरीतून वर काढतानाही तिच्या ओलेतीच्या रूप सौंदर्याचे आणि युवराजांच्या प्रणयाचे चित्र रेखाटले आहे. देवयानी आत्मकेंद्रित आहे. ती स्वतःसाठी जगते. ययातीचे देवयानीशी म्हणूनच बिनसते. 'एकवेळ खायला मिळाले नाहीतरी चालेल, एकमेकांच्या ओठातल्या अमृतांवर जगू' असे सांगणारी मैत्रीण राजा ययातीला हवी होती. ती शर्मिष्ठेच्या रूपात त्याला मिळाली आणि त्यांचा 'विडा' चांगलाच रंगला आहे. या कादंबरीत शृंगाररसाची खांडेकरांनी केलेली ही पेरणी ययातीच्या भोगी, सुखलोलुपतेच्या चित्रणासाठी आवश्यक होती म्हणूनच एवढ्या विस्ताराने ती या ठिकाणी चित्रित झाली आहे. 'मधाचा आस्वाद घेतांना, मधमाशांचे मोहळ उठते.' ययातीला, त्याच्या कामोवृत्तीने त्याच्याबद्दल उठलेल्या अशाच एका मोहळाला तोंड द्यावे लागले. ययाती महाराजांच्यासाठी सूर्यफूल झालेली शर्मिष्ठा 'ययाती - शर्मिष्ठा' प्रेमाचा साक्षात्कार घड- विणारी आहे..." सूर्यफूल' होऊन ती या सूर्याची आराधना करते तर दुसरीकडे 'झुळझुळते पाणी गोठून जावे अशी देवयानी माझ्या बाहु- ५९