पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दाखवितो. 'भाऊबंदकी' नाटकासारखाच हा आरसा येथे काम करतो. ययातीला त्या पांढन्या केसामुळे आपल्या वार्धक्याची जाणीव होते. आवश्यकतेनुसार पात्र योजना होते. येथे फक्त 'यदू' आणि 'पुरू' या दोन मुलांचाच उल्लेख खांडेकरांना पुरेसा वाटतो. कविगत न्यायात आणि काव्यात्म अनुभवात जेवढे बसते तेवढेच त्या साहित्यिकाचे भाव- विश्व असते याचा प्रत्यय पौराणिक साहित्यकृतीत नेहमीच येतो. शिरवाडकरांच्या 'ययाति आणि देवयानी' या नाटकात शुक्राचार्य पुन्हा येत नाही. देवयानीत शाप देण्याचे सामर्थ्य आहे. 'ययाति' कादंबरीचा शेवटही असाच खांडेकरकल्पित आहे.. कच ' पुरु' चे वार्धक्य दूर करतो. पुरू यदूला राज्य देतो या • सख्याच्या कल्पनेने देवयानी विरघळते शेवटी सगळा आनंदीआनंद होतो. देवयानी - शर्मिष्ठा ययातीची सेवा पंख्याने वारा घालून आणि पाय दाबून करीत असल्याचे चित्रित केले आहे. येथेही सवतीमत्सर नको म्हणून या कामात सूचक अदलाबदल करतात कादंबरीच्या शेवटी पुरूच्या त्यागानेच कुरुवंश झाला असे सांगितले आहे. वि. स. खांडेकरांनी या कथानकाचा एक धागा आपल्या कल्प- कतेने ययातीचा पूर्वज 'नहुष' याच्या अतृप्तीशी आणि उद्दामपणाशी जोडला आहे. 'कर्णायन' मध्ये गो. नी. दांडेकर यांनी जसा कर्णाचा संबंध दुर्वासाशी प्रस्थापित केला, तसा येथे नहुष कथेचा कलात्मक संबंध खांडेकरांनी प्रस्थापित केला आहे येथे ययाती नहुषाचा वारस शोभतो या असंख्य कल्पनाचित्रांनी खांडेकरांची ययाति कादंबरी एक 'स्वतंत्र' कादंबरी होते. महाभारतातील ययातीकथेचे एक अमर विकसन म्हणून 'ययाति' कादंबरीचा उल्लेख करावा लागतो. शृंगारिक कल्पनांची पखरण :- खांडेकरांनी 'ययाति' कादंबरीत रसराज शृंगाराचा आविष्कार स्वतंत्रपणे केला आहे. कामी ययातीच्या चित्रणासाठी या रसाचा परिपोष त्यांना आवश्यक वाटला असावा. या कादंबरीतील व्यक्तींचे ५८ ..