पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ययाती उपाख्यानाच्या नव्या मांडणीला अपूर्व यश मिळवून देते. एवढी अजोड कल्पकता, खांडेकरांच्या या पात्रमुखी आणि तरीही एकसंध • अनुभवाचा प्रत्यय देणान्या निवेदन - पद्धतीत आहे. नंतर मराठी ललित साहित्यात या निवेदन पद्धतीचे जे अनुकरण झाले त्यात विस्कळित- पणाचा दोष आढळतो. खांडेकरांच्या ययातीसारखा एकात्म अनुभवाचा प्रत्यय 'मृत्युंजय' कादंबरीतून येत नाही. खांडेकर जागोजाग व्यक्तींचें मनोविश्लेषण करतात ते मोठे मनोवेधक आणि लक्षणीय झाले आहे. स्वतंत्रः प्रतिभाशक्तीचा येथे विलास दिसतो. ययातीचे बालमन, शर्मि- ष्ठेची गर्भावस्था त्यावेळची तिची मनःस्थिती, 'पुरू'च्या जन्मानंतरची जाणीव सारेच अपूर्व आहे. या खांडेकरकृत बदलातून आणि स्वतंत्र कल्पकतेतून महाभारताची अनेक अंगानी वाढ झाली असे लाक्षणिक अर्थाने म्हणता येते. ययातीला बालपणापासून असलेला फुलांचा हव्यास कामवृत्तीचा द्योतक आहे, शृंगारानुभवाची सूचना देणारा आहे. 'आईने मुलाला पाजायचे असते' हा या ययातीच्या बालमनाचा सरळ हिशेब आहे. 'यती' गमावल्याचे आईचे दुःख ययातीला उमगते म्हणूनच कोवळा ययाती प्रवृत्तीवर जीवन जगण्याची प्रतिज्ञा करतो. हळुवार नाजुक मनाचे हे विश्लेषण निःसंशय कलात्मक आहे. साध्या पक्षिणीच्या वधाने हळहळणारा ययाती भोगाचे, शक्तीचे तत्त्वज्ञान हळूहळू पचवितो. शर्मिष्ठा आपण आई होणार या कल्पनेने सुखावते. तिच्या विविध भाव-भावनांवर येथे लक्षणीय प्रकाशझोत खांडेकरांनी नव्याने टाकला आहे. महाभारतातील व्यक्तींच्या मनातील धागेदोरे येथे नीट उलगडतात. त्यांच्या व्यक्तित्त्वांच्या गाभ्याला स्पर्श होतो आणि महाभारत फुलते ते अशा ठिकाणीच. ययातीने पुरूचे चुंबन घेतल्यानंतर पुन्हा पुरूचे चुंबन घेतलेल्या शर्मिष्ठेला आनंदात न्हाल्यागत वाटते. 'पुरू'चा एकाक्षरी 'त-त' मंत्र ( तात सूचक) देवयानीसमोर चालू होताच शर्मिष्ठेला धस्स होते. क्रूर देवयानी काय करील याचा नेम नाही हा थरारक प्रसंग कल्पनेचा विलास आहे. माणसाच्या 'माणूसपणा' चे चित्रण आहे. . ययातीला समोरचा 'आरसा' डोक्यातील पहिला पांढरा केस ...५७