पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खरी ययातीची प्रेमाची तहान भागते. एक अप्रतिम कलात्मक प्रसंग: खांडेकरांच्या प्रतिभेने येथे निर्माण केला आहे. 'कीचकवध' नाटकात कीचकाला सैरंध्री ओवाळते आणि नंतर कीचक सैरंध्रीचा ध्यास घेतो. प्राचीन कालखंडात स्त्रियांच्या या ओवाळण्यात मोठी सूचकता होती.... तोच अर्थ येथे व्यक्त झाला आहे. तो पत्नीचा अधिकार असतो. स्निग्ध ज्योतीच्या प्रकाशात, लावण्यवती शर्मिष्ठा अधिकच उजळते. पुढील कथाभागात देवयानीच ययातीला श्रृषीचे सोंग वठवायला लावून शर्मि- ष्ठेचा सूड घेऊ इच्छिते पण या कृत्याने आपल्या स्वतःच्याच पायावर घोंडा पडणार हे तिच्या गावीही नाही. ययाती भुयारमार्गाने येऊन शर्मिष्ठेला भेटतो ही खांडेकरांची स्वतंत्र प्रसंग-निर्मिती आहे. या योजनेने प्रणयिनी शर्मिष्ठा सारे नशिबाचे भोग भोगूनही 'सारे भरून पावते. ' यदु आणि दस्यु यांच्यातील युद्ध, त्यातून पुरु, यदुची सुटका करतो हा प्रसंगही खांडेकरांच्या स्वतंत्र कल्पनेतून निर्माण झाला आहे. त्यामुळे शेवटी देवयानी द्रवते आणि शर्मिष्ठेशी सख्य जोडण्याचा प्रयत्न करते, यदूच्या पराभवाच्या वार्तने महाराणीपदापेक्षा मातृत्त्वपद देव- यानीला महत्वाचे वाटते. वि. स. खांडेकरांनी या चित्रणात देवयानीचा दारूण पराभव साकार केला आहे. कादंबरीचा शेवट संपूर्णपणे खांडे- करांचाच आहे. या सर्व खांडेकरकृत बदलांना कलांतर्गत न्यायात संगती आहे. स्वतंत्र कल्पकता :- वि. स. खांडेकरांच्या प्रतिभेने हे असे विपुल बदल महाभारतातील ययाती उपाख्यानात केले आहेत. या ठिकाणी ते बदल लक्षात घेतल्या- नंतर आता खांडेकरांच्या स्वतंत्र कल्पकतेचा विलास आणि त्यांनी या कादंबरीत केलेला शृंगाररसाचा आविष्कार येथे पहावयाचा आहे. खांडेकरांनी एकूण संपूर्ण ययाती उपाख्यानाची नवी संगती लावली आहे. नवी उभारणी केली आहे. या कादंबरीतील शुक्राचार्य कच ययाती यांच्या आगमनाने व पुनरागमनानेही कलात्मकतेचा प्रत्यय येतो. या कादंबरीची निवेदनशैली ५६...