पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काही राजकन्या जन्मत नाहीत' या खांडेकरांच्या पोक्त विचाराने या कादंबरीत शर्मिष्ठा दास्य पत्करते. शुक्राचार्यांचा 'देव' कचाने विद्ध केला आहे. 'मनात प्रथम रुजलेले प्रेमच खरे' या कल्पनेने कचाला देवयानी या कादंबरीत शेवटी कां होईना पण मानते. शर्मिष्ठा देवयानीला वस्त्रांच्या अदलाबदलीतून निर्माण झालेल्या भांडणाच्या झटापटीत विहिरीत ढकलते, नव्हे, ती ढकलली जाते. खांडे- करांनी केलेल्या या बदलातून शर्मिष्ठेविषयीची सहानुभूती व्यक्त होते. देवयानीला सोडून ती निघून जाते. यापुढील गोष्टीविषयी खांडेकर मौन पाळतात. आकाशात दोन विजा एकदम येऊन आपटाव्यांत तशी सासू सुनेची पहिली चकमक, ययातीची आई, शर्मिष्ठेला मैत्रीण म्हणते. त्यावरून झडते. ही चकमक देवयानीच्या स्वभावाविषयी पुष्कळसे सुचवून जाते. तिचा अहंकार येथे स्पष्ट होतो. राजवाडघात नव्याने आणलेला ज्योतिषी आणि त्याने उठवून दिलेले काहूर मोठे लक्षणीय आहे. 'देवयानी व शर्मिष्ठा दोघीनांही पुत्र प्राप्ती होईल पण त्यात शर्मिष्ठेचा पुत्र सिंहासनाधिकारी होईल' असे भाकीत करून तो ज्योतिषी निघून जातो. पण त्याचे पडसाद कादंबरीभरु उमटतात ययाती - देवयानीच्या मधुमीलनाच्या पहिल्याच रात्री केवढी दाणादाण होते. शर्मिष्ठेला तबकात विडे घेऊन उभे केल्याचा तो तळ- तळाट असावा असे वाटते. कारण शर्मिष्ठा ही एक सोशिक, अतृप्त प्रणयिनी होती. देवयानीच्या मद्याविषयीच्या तिटकान्याने ययाती- देवयानी संबंध दुरावतात. खाडिलकराच्या ' विद्याहरणातील शुक्रा-- चार्यांच्या मदिरासंप्रदायातील ' ही देवयानी नाही. तिचा मद्याविषयीचा हा तिटकारा मूळकथेत एवढा तीव्र नाही. ययातीला देवयानी ओवाळणार एवढ्यातच दूत येऊन शुक्रा-- चार्यांचा निरोप सांगतात. शेवटी मुहूर्त टळू नये म्हणून ययातीची आई शर्मिष्ठेला ओवाळण्यास सांगते. शर्मिष्ठेच्या मनःपूर्वक ओवाळण्यानेच ५