पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लिहिलेली 'स्वतंत्र कादंबरी' असे जे खांडेकरांनी या कादंबरीचे वर्णन केले आहे त्या स्वतंत्रतेचा प्रत्यय 'ययाति' मधून येतो. • सुखोपभोगाकडे धाव घेणारा, कामुकांचा प्रतिनिधी बनलेला, शर्मिष्ठेच्या सौंदर्याला, सुरेख आवाजाला आणि उदात्त प्रेमाला भाळलेला, आसक्तीचा प्रतीक 'ययाती' उदात्त, उत्कट, जिवापाड प्रेम करणारी, समर्पणशील वृत्तीची गुणी 'शर्मिष्ठा'; गविष्ठ, दुष्ट आणि अहंकारी 'देवयानी'; परिणत प्रज्ञ, धीरोदात्त, कमालीचा ध्येयनिष्ठ एकाग्र- चित्ताचा. पण सहृदयतेने प्रेम जागविणारा 'कचदेव' अध्यात्माच्या अतिरेकाने बेताल झालेला 'यती'; या सान्या व्यक्तिरेखा खांडेकरांच्या 'ययाति' कादंबरीत नव्याने साकार झाल्या आहेत. कच, यती यांना वि. स. खांडेकरांनी नव्याने महत्त्व दिले आहे. खांडेकरांचा प्रतिभेचास्पर्श :- 'ययाति' कादंबरीमध्ये खांडेकरांच्या प्रतिभेचा स्पर्श कथा- नकातील कलात्मक बदलातून, नव्या कल्पकतेतून आणि शृंगार या रसराजाच्या निर्मितीतून जाणवतो. खांडेकरांची 'ययाति' कादंबरी ही आधुनिक माणसाच्या नव्या आकांक्षेची कथा आहे.- खांडेकरांनी कच - देवयानी उपाख्यान आणि ययाती - शर्मिष्ठा उपाख्यान प्रथमतः नव्याने एकत्र गुंफले आहे. त्यामुळे कादंबरीचा विस्तार वाढला व कक्षा रूंदावल्या शिवाय खांडेकरांना कलांतर्गत सुसंगती प्रस्थापित करता आली. या अनुभवाला विविध परिमाणे प्राप्त करुन देता आली. महाभारत उपाख्यानाच्या निमित्ताने एक प्रचंड जीवनानुभव व्यक्त करणारी ही कादंबरी झाली. शर्मिष्ठेला कचाविषयी वाटणारे उत्कट अनोखे प्रेम, नव्यानेच येथे आले आहे, ते स्वाभाविक वाटते कारण शुक्राचार्यांच्या आश्रमात कच, देवयानी, शर्मिष्ठा सगळेच एकत्र वावरले आहेत. 'सगळयाच ५४...