पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उलगडली. पण- १९४२ नंतरच्या चिंतनाने या प्रणयकथेचे रंग पुन्हा बदलले. प्रारंभी शर्मिष्ठेची प्रणयकथा म्हणून ही कादंबरी लिहिण्याचा त्यांच्या मनाचा कौल होता, पण नव्या परिस्थितीने त्याला कलाटणी मिळाली. वि. स. खांडेकरांना दोन महायुद्धानंतर बदललेल्या परिस्थि- तीची, यंत्र, विज्ञान आणि अंतराळ युगातील नव्या माणसाच्या संयमविहीन सुखलोलुपतेची चाहूल लागली. माणसाच्या अनिर्बंध भोगलोलुपतेची जोड या कथेच्या चिंतनाला मिळाली. समाजात 'कच थोडे, ययाती फार' हे चित्र त्यांच्या दिव्यप्रतिभाचक्षूला दिसू लागले. या कथाबीजाला नवे धुमारे फुटले. खांडेकरांना, अनिबंध मनाला संयमाचा लगाम घालण्याची आवश्यकता जाणवली. त्यातूनच 'ययाति' कादं- बरीचा आविष्कार झाला. पुराणकथा बरेच काही नवे सांगू शकते या जाणिवेने ययाती कथेची खांडेकर प्रणीत नवी घडण झाली. कथावस्तूतील बदल :- ययातीच्या चरित्रावरून उद्याच्या जगाचे भीषण भवितव्य जाणवावे ही खांडेकरांची अपेक्षा आहे. मनाला संयमाने आवर घालणे मानवतेसाठी इष्ट आहे, हे येथे ध्येयवादी खांडेकरांना सांगायचे आहे. 'ययाति' कादंबरीचा घाट (Form ) या पार्श्वभूमीने सिद्ध केला आहे. हे खांडेकरांची ही अनुभूती ययाती उपाख्यानाशी निगडित होऊन तदाकार झाली आहे. या समरसीकरणातूनच मूळ कथेत स्वानुकूल बदल करण्याचे सामर्थ्यं साहित्यिकाला प्राप्त होते. म्हणूनच खांडेकरांनी कथा नव्याने अभिव्यक्त केली. त्यासाठी स्वतःचे एक समर्थन खांडेकर देतात. 'उपाख्यान म्हणजे मूळ कथा नव्हे म्हणून तीत नक्कीच, बदल करण्याचे स्वातंत्र्य घता येईल. ' पण युक्तिवादाचीही आवश्यकता नाही : पुराणकथा (Myth ) हव्या तशा आकार धारण करू शकतात याचा भास, कालिदास, भवभूती यांनी जणू वस्तुपाठच घालून दिला आहे. पुराणकथा ललित साहित्यिकाच्या अनुभूतीचा भाग बनली म्हणजे ययाती सारखी नवनिर्मिती संभवते. पुराणांतल्या एका उपाख्यानांतील कथासूत्राचा आधार घेऊन ... ५३