पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ययातीला, शुक्राचार्यांकडून वार्धक्य प्राप्तीची शिक्षा देव विते. ययातीची प्रवृत्ती लक्षात घेता त्याच्यासाठी या शापाहून अन्य कोणताही शाप भयानक असू शकत नाही. शेवटी 'ही जरा आपल्या कुलातील माणसाला देता येईल' हा उःशाप शुक्राचार्य देतात. या कसोटीला फक्त त्याच्या प्रिय शर्मिष्ठेचा 'पुरु' उतरतो. तोच पुढे राज्याधिकारी होतो. त्यावरूनच या वंशाला 'पुरू' हे नाव मिळाले आहे. देवयानीच्या तृप्तीसाठीच ययातीने हे तारुण्य पुन्हा मिळविलेले असते. पुरू शिवाय अन्य चारही पुत्रांना ययाती शाप देतो. 16 'ययाती' कादंबरीची जन्मकथा :- वि. स. खांडेकरांना मनापासून पुराणकथेचे आकर्षण आहे. आपल्या साहित्यात ते पौराणिक रूपके- प्रतीके आणि दृष्टांतांची योजना सर्रास करतात. त्यांच्या प्रतिभाविश्वातूनही हेच जाणवते. इ. स. १९५९ साली खांडेकरांनी 'ययाति' कादंबरी लिहिली असली तरी हे ययातीउपाख्यान १९१४ सालापासूनच त्यांच्या मनात रूजलेले होते. म्हणजे १९१४ ते १९५९ या ४५ वर्षांच्या कालावधीत त्यांच्या मनात या विषयाचे चिंतन चालू होते असे दिसते. म्हणूनच 'ययाति' ही खांडेकरांच्या प्रतिभेचा एक परिपक्व आविष्कार आहे. या प्रदीर्घ चित- नाच्या कालावधीत ययाति कयेची भिन्न भिन्न रूपे त्यांना जाणवली आहेत. खांडेकरांना महाविद्यालयीन जीवनात 'अभिज्ञान शाकुन्तलम् । ' अभ्यासाला होते. सासरी जाणान्या शकुंतलेला कण्वाने दिलेला 'ययातीला शर्मिष्ठा जशी प्रिय झाली तशी तू आपल्या पतीला प्रिय हो ! हा आशीर्वाद त्यांच्या मनात ठसला. कालिदासाच्या या उक्तीचे त्यांनी सखोल चिंतन केले. या चिंतनातून ययाती - शर्मिष्ठेची प्रेमकथा त्यांना 17 ययातेरिव शर्मिष्ठा भर्तुर्बहुमता भव । सुतत्वमपि सम्राजं सेव पुरुमवाप्नुहि ॥ अभिज्ञानशाकुन्तलम् : कालिदास : अंक ४ : श्लोक ७

सं. अ. बा. गजेंद्रगडकर, १९३४ (८८

५२