पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'उत्तरयायात ' ( यात ययातीचे स्वर्गात जाणे, अधःपतन होणे ही कथा यात आली आहे. ) आहे. प्रस्तुत ठिकाणी फक्त ययाती उपाख्यानाचाच विचार करावयाचा शुक्राचार्यांच्या संमतीनेच ययाती देवयानी विवाह होतो. देवयानी, तिला अरण्यातील विहिरीत ढकलून निघून जाण्याचे निर्घुण कृत्य करणाऱ्या शर्मिष्ठेला, राजकन्या असूनही दासी करून बरोबर घेते देवयानीचा अक्षम्य अपराध शर्मिष्ठेने केल्याचे येथे जाणवते. कारण ययातीने जणू देवयानीला विहिरीतून उजवा हात धरून वर काढून पुनर्जन्म दिला. शर्मिष्ठा राजकन्या आहे. हे ययातीला माहीत आहे. शुक्राचार्यांनी त्याला जाणीव करून दिली आहे, की 'कधीही शर्मिष्ठेला सहशयनाला बोलावू नकोस.' शर्मिष्ठेला, देवयानीला विहिरीत लोट- ण्याच्या दुष्कृत्यामुळे हे शासन भोगावे लागणार होते. तिचे हे कृत्य 'स्त्रीत्वा' ला साजेसे नाही. तत्कालीन सामाजिक संकेतानुसार शर्मिष्ठा आपला डाव टाकते. 'राणीबरोबर तिची दासीही राजाला भोग्य असते अशा दासीची इच्छा पूर्ण करणे राजाचे कर्तव्यच असते, असे पटवून देऊन शर्मिष्ठा गांधर्व विवाह पद्धतीने ययातीशी विवाहबद्ध होते. शर्मिष्ठेला ययातीपासून धर्मविधीने 'यू', 'अनु' व 'पुरू' ही तीन अपत्ये होतात. देवयानीला मात्र दोनच ' यदु' आणि 'तुर्वसु' ही मुले होतात. येथेही पुन्हा तत्कालीन संकेतानुसार सवतीमत्सर उफाळून येतो. मुलांची संख्या हे सवती मत्स- राला कारण होते. ययातीच्या चेहन्यांशी असलेल्या साम्यातूनच देवयानी शर्मिष्ठेला ययातीपासून मुले झाल्याचे ओळखते. शरीरविज्ञानाच्या, क्षेत्रातील नैसर्गिक सत्याचा मनोज्ञ आविष्कार महाभारतात आहे, हे येथे लक्षात येते. हा उलगडा जास्त सुसंगत व पटण्याजोगा आहे. या एकूण प्रकाराने देवयानीचा प्रकोप ओढवतो आणि ती 16 ययाती उपाख्यान : महाभारत : आदिपर्व, अध्याय ( १७ ते २५) पृ. १९७ ५१