पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निमित्ताने सापडले. खांडेकरांच्या प्रतिभेची सारी वैशिष्टये 'ययाति' कादंबरीत गुणांमध्ये रूपांतरित झाली आहेत. येथे जणू काही कस्तुरी मृगाला 'कस्तुरी' चा शोध लागला आहे. 'ययाति' कादंबरीने पौराणिक कादंबरीच्या एका नव्या पर्वाला सुरवात केली आहे. ' 18 पौराणिक ललित साहित्याची निर्मिती करणाऱ्या साहित्यिकाला मूलतःच काही अनुकूलता प्राप्त होते. म्हणजे ती पुराणकथा जनमानसात रुजलेली असल्याने, ज्ञात असल्याने, आपोआपच जनरुचिसंवाद साधला जातो. त्याचप्रमाणे कधी कधी जनरुचिसंवादाऐवजी विसंवादालाही त्याला सामोरे जावे लागते. पौराणिक तपशिलात बदल करतांना त्या साहित्यिकाच्या मनात धास्ती असते. शेवटी कलावंताने कला निष्ठ राहून अंतर्गत सुसंगती असलेला नवा कलात्मक आकृतीबंध शोधणेच अपेक्षित असते. वि. स. खांडेकरांच्या याच कलादृष्टीने ययाती कथेला नवे रूप प्राप्त करून दिले आहे. महाभारतातील ययाती उपाख्यानाचा या कादंबरीत केवळ संक्षेप विस्तार होत नाही तर आपल्या प्रतिभासामर्थ्याने खांडेकरांनी एक नवी अर्थपूर्ण कलाकृती निर्माण केली आहे. प्रबोधनाच्या प्रेरणेने ती जन्माला आली असून रंजकही झाली आहे. 'ययाति' कादंबरीने रंजन आणि प्रबोधन या दोन्हीही प्रेरणांवर मात करुन अंतिमतः कलात्मक रूप धारण केले आहे. महाभारतातील ययाती उपाख्यान :- महाभारतात या उपाख्यानाचे एकूण तीन भाग पडतात. पहिला भाग म्हणजे 'कचोपाख्यान' (यात कचाच्या संजीवनी विद्येच्या हरणा- पर्यंतचे कथानक येते. ) दुसरे 'ययाती आख्यान' (यात ययाती देव- यानीच्या पाणिग्रहणापासून पुरूने ययातीचे स्वीकारलेले वार्धक्य दूर केले व त्याला पुन्हा यौवन प्राप्त झाले येथपर्यंतचा भाग येतो. ) तिसरे 15 प्रदीर्घ पौराणिक, चरित्रात्मक कादंबन्या व विशेषतः ययाती उपा- ख्यानावरील नाटकांना या कादंबरीने प्रेरणा दिली आहे. ५०