पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाहतात, त्याचा शोध घेतात आणि त्यातून नवनिर्मिती करतात. ' खांडेकरांचे श्रेय :- 13. ययाती उपाख्यानाला मराठीत ललित साहित्यात लोकप्रिय ' * आणि कलात्मक स्वरूपात साकार करण्याचे श्रेय प्रथमतः वि. स. खांडेकरांचेच आहे. संस्कृत साहित्यात या काव्यात्म आणि नाट्यात्म उपाख्यानाचा आधार घेऊन ललितसाहित्यनिर्मिती झालेली आढळत नाही. खांडे- करांची प्रतिभाशक्ती आणि कलादृष्टी या पार्श्वभूमीवर उठून दिसते. कुसुमाग्रजांनी आपल्या 'किनारा' या काव्यसंग्रहात 'उषा-स्वप्न' या कवितेत एक पौराणिक कथानक भावपूर्ण, अत्यंत तरल आणि नाजुक छटांसह समर्पक शब्दात रंगविले आहे. या उपाख्यानाकडे मराठी रसि- कांचें लक्ष वेधल्याबद्दल खांडेकर 'शिरवाडकरांना' जे मानाचे पान देऊ इच्छितात तेच ययाती उपाख्यानाच्या संदर्भात त्यांचे श्रेय आहे. सामाजिक कादंबरीचे क्षेत्र वि. स. खांडेकरांसारख्या गरुडाच्या भक्कम जीवनवादी पंखांना विहार करण्यास अपूर्ण वाटू लागले 'पुष्क- रणीच्या तरंगात सागर लाटांची प्रक्षुब्धता कशी असेल ? ' म्हणून ते पौराणिकतेकडे वळले. पौराणिक कथा नुसते मानवी जीवन साकार करीत नाहीत तर आणखी काहीतरी अगम्य, चिरंतन तत्त्व त्यातून सूचित होत असते. खांडेकरांच्या प्रतिभेला आपले खरे क्षेत्र या कथेच्या 13 आपल्या पुराणकथा या साहित्यिकाच्या दृष्टीने सोन्याच्या खाणी आहेत. ग्रीक पुराणकथांनी सोफोक्लज पासून युजिन ओर्नीलपर्यंत अनेक कलावंत प्रतिभेला आवाहन केले आहे. मानवी भावनांच्या आणि वासनांच्या संघर्षांनी रसरसलेले साहित्य नवनिर्मितीकरता त्यांच्या हाती दिले आहे. भारतीय पुराणकथांतही हें सामर्थ्य निःसंशय आहे. ययाती : वि. स. खांडेकर, १९६७ (पृ. ४४९ ) 14 रसिकप्रियतेचा उच्चांक या कादंबरीने मराठी साहित्यात गाठला आहे. · आजवर 'ययाति' कादंबरीच्या ३४००० प्रती खपल्या. प्रस्तुत कादं- बरीची ४ थी आवृत्ती १६००० प्रतोंची होती. या संख्यात्मक मालेखा- तून याची कल्पना येईल. ४९