पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आकार प्राप्त होत होते. अगदी सुरुवातीला त्यांना ययाती केवळ कामी पुरुष म्हणून जाणवला. पण दोन महायुद्धानंतरची परिस्थिती ययातीला अधिक व्यापक करण्यास कारणीभूत ठरली. नुसत्या कामभावनेचा प्रतीक म्हणून, पुढे हा ययाती राहिला नाही तर सर्वच प्रकारच्या प्रलोभनाचा, . कधीही न संपणाऱ्या हावरटपणांचा, लोभी मनोवृत्तीचा आणि सर्व • प्रकारच्या मोहाचा तो प्रतिनिधी झाला. महाभारतातील कथानकाचे साहित्यिकांनी अंतर्मुख होऊन सतत चिंतन केल्याने किती विविध अर्थ निर्माण होतात. नवी संगती अनुभवाला येते याचे मूर्तिमंत उदाहरण आहे 'ययाति' कादंबरी. या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया आणि खांडे- करांनी या कथानकात भरलेला नवा, जिवंत आशय पाहिला म्हणजे मराठी ललित साहित्यिकांचे सामर्थ्यही प्रत्ययाला येते. मराठी प्रतिभेने महाभारतात काही मौलिक भर टाकली. त्यातील व्यक्तिरेखा आणि घटना-प्रसंगांना, कथानकाला सुविकसित केले असे येथे दिसून येते. 'ययाति' कादंबरीची पार्श्वभूमी --- या कादंबरीची पार्श्वभूमी विशद करतांना स्वतः खांडेकरांनी अतिशय महत्त्वाचें निवेदन केले आहे. ते म्हणतात, 'या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही. एका प्रसिद्ध पौराणिक उपा ख्यानाचे धागेदोरे घेऊन ते मी स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत. 12 एका अलक्षित राहिलेल्या महाभारतीय उपाख्यानाकडे खांडेकरांनी साय मराठी वाचकांचे आणि अन्य भाषांतील रसिकांचे लक्ष 'ययाति' कादंबरीच्या निमित्ताने वेधून घेतले आहे. या उपाख्यानाच्या आधाराने त्यांच्या दिव्य प्रतिभेचा साक्षात्कार घडतो. त्यांचे हे ययाती उपाख्यानाचे आंकलन प्रतिभाजनित आहे. त्या आकलनात कालातीतता आहे म्हणूनच काव्यात्मताही अवतरली आहे. 'अद्भुतरम्यतेच्या धुक्यांत पूर्णपणे झाको- ळून गेलेल्या काळाचा' म्हणजेच पुराणकाळाचा त्यांनी आधार घेतला. मोठ्या आत्मविश्वासाने ते या महाभारतातील ययाती उपाख्यानाकडे ४८... 12 ययाति : वि. स. खांडेकर, चवथी आवृत्ती, १९६७ (पृ. ४४७)