पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रीतीने केला गेला याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून श्रीखंडे यांच्या या • नाटकाचा निर्देश करता येतो. मनोरंजनाची प्रेरणा प्रभावी ठरल्यानंतर महाभारतातील कथोपकथांचा लेखकाच्या दृष्टिकोनातून कसा आविष्कार . होतो आणि महाभारतातील कथोपकथांना कसे रूप प्राप्त होते याची साक्ष हे नाटक देते. रंजनासाठी आवश्यक तेवढा कथाभाग स्वीकारून त्यात मनःपूत बदल आणि स्वच्छंदपणे प्रसंगाची निर्मिती करण्याचे स्वातंत्र्य नाटककाराने येथे घेतले आहे. महाभारतावर आधारित ललित साहित्यकृतीचा अभ्यास करतांना ही प्रवृत्तीही लक्षात घेणे आवश्यक होते. वि. स. खांडेकरांची 'ययाति' कादंबरी :- ययाती उपाख्यानावरील सर्वोत्कृष्ट मराठी ललित साहित्यकृती म्हणून वि. स. खांडेकरांच्या 'ययाति' कादंबरीची विस्ताराने चर्चा प्रस्तुत ठिकाणी करणे आवश्यक आहे. 'ययाति' सारख्या कादंबरीनेच प्रस्तुत अभ्यास- विषयाला विशेषं चालना दिलेली आहे. जे ययाती उपाख्यान विविध रसनिर्मितीसाठी (शृंगार, करुण, हास्य, अद्भुत इ. ) पूर्वी साहित्यिकांनी स्वीकारले होते. त्या ययाती उपाख्यानाचे सामर्थ्यं वि. स. खांडेकरांनी अचूकपणे हेरून त्याची कलात्मक अभिव्यक्ती 'ययाति' कादंबरीच्या रूपात केली आहे. या कादंबरीचा विषय खांडेकरांच्या मनामध्ये लहानपणीच रूजला होता. पुढे तो कितीतरी काळपर्यंत त्यांच्या मनामध्ये सतत घोळत होता. या कालावधीत या विषयाने त्यांच्या मनामध्ये कितीतरी वळणे घेतली. त्यांना विविध तऱ्हेने तो जाणवला. प्रारंभी ययातिशर्मिष्ठा यांची अजोड प्रीतिकथी म्हणून ययाती' उपाख्यानाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. एक नवे सूत्र आणि नवे आकृतिबंध या उपाख्यानातून त्यांनी शोधले. सखोल चिंतन केलें.: सभोवतालच्या परिस्थितीचा संस्कार वि. स. खांडेकरांच्या मना- वर प्रभावीपणे होत होता. या उपाख्यानाला नव्या वातावरणातून नवे